आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर अपघाताच्या दोन घटना, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Asangaon-Kasara Railway Accident : गणेशोत्सवाच्या काळात आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या घडलेल्या दोन्हीही घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या दुर्घटना
दोघांचाही अंत झाला
Asangaon-Kasara Railway Accident : गणेशोत्सवाच्या काळात आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या घडलेल्या दोन्हीही घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. आनंदाच्या सणात कुटुंबावर शोककळा पसरली होती. या घटनेनं कुटुंबासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच नागरिकांसह नातेवाईकांनी देखील हळहळ व्यक्त केली.
हे ही वाचा : Astrology : आजचे काही राशींचे भविष्य घ्या जाणून
पहिल्या घटनेत नेमकं काय घडलं?
पहिल्या घटनेत आसनगाव रेल्वे स्थानकावर कचाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला. लोकल पकडण्याच्या प्रयत्नांत प्रवाशाचा पाय घसरला आणि तो लोकलमधून पडल्याची घटना आहे, ज्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान संबंधित मृताची ओळख निवृत्ती साबळे (वय 65) अशी ओळख समोर आली. ते वीर जिजामातानगर येथील रहिवासी होते. तर असाच दुसरा प्रकार आसनगाव-कसारा रेल्वे मार्गादरम्यान घडला.
दुसऱ्या घटनेत काय घडलं?
आसनगाव-कसारा रेल्वे मार्गादरम्यान देखील अशीच दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेचा एकाचा मृत्यू झाला होता. मृताची दीप कैलास घोलप (वय 20) अशी ओळख समोर आली. दीप हे सध्या आपल्या कुटुंबासह चेरपोली, यमुनानगर येथे राहत होते. त्यांचे मूळ गाव मानिवली-घोलपांची, तालुका मुरबाड असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut Interview : तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?
आनंदाचा सण असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या दोन दुर्दैवी घटनांमुळे कुटुंबावर शोक पसरला होता. आनंदाच्या या सणात जवळच्या व्यक्तीला गमावल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
