कुंकू भांगेत रक्त लावलं, अल्पवयीन मुलीस उचलून घेऊन गेली तरुणी; समलैगिंक संबंधासाठी वापरलं खोटं नाव
UP Crime News : कानपूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची पश्चिम बंगालमधून सुटका केली असून, 'नव्या' नाव सांगून मुलीला फसवणाऱ्या आणि तिच्याशी लग्न करणाऱ्या रुमाना खातूनला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुंकू भांगेत रक्त लावलं, अल्पवयीन मुलीस उचलून घेऊन गेली तरुणी
समलैगिंक संबंधासाठी वापरलं खोटं नाव
UP Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी एका बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची पश्चिम बंगालमधून सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रुमाना खातून नावाच्या एका तरुणीला अटक केली असून तिने पीडित मुलीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूरच्या साढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही मुलगी 5 एप्रिल रोजी अचानक बेपत्ता झाली होती. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 'नव्या' नावाच्या एका मुलीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध सुरू केला असता, त्या मुलीचे लोकेशन पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, ज्या मुलीने पीडितेचे अपहरण केले होते तिचे खरे नाव नव्या नसून रुमाना खातून आहे.
नाव बदलून मैत्री अन् पुढे काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या रुमाना खातूनने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलीशी संपर्क साधला होता. तिने स्वतःची ओळख 'नव्या' अशी करून दिली आणि मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडित मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर रुमाना तिला आपल्यासोबत पश्चिम बंगालला घेऊन गेली होती. तिथे या दोघींमध्ये समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले होते. क्रूरतेची सीमा ओलांडत रुमाना खातूनने स्वतःच्या रक्ताने या अल्पवयीन मुलीची मागणी भरली होती आणि तिच्यासोबत 'निकाह' सारखे धार्मिक विधी पार पाडले होते. ओळख लपवून आणि धर्माची खोटी माहिती देऊन तिने या मुलीची दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा : अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?
आरोपी तरुणीची रवानगी तुरुंगात
या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर कानपूर पोलिसांचे एक पथक रुमानाला पकडण्यासाठी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात रवाना झाले होते. मात्र, पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच आरोपी रुमाना तिथून मुलीला घेऊन पसार झाली. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरूच ठेवला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती गोळा केली. अखेर, आरोपी तरुणी आणि पीडित मुलगी कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहोचल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर सापळा रचून रुमाना खातूनला अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. या कारवाईमुळे मोठ्या कालावधीपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध लागला असून तिच्या पालकांनी सुटकेनंतर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.









