Maharashtra Weather : सूर्य कोपला अन् महाराष्ट्र तापला, 'या' 23 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
maharashtra weather : कोकण विभागात 17 मार्च रोजी हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात उष्णतेनं अंगाची लाही लाही झाली
राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेनं अंगाची लाही लाही झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे काही ठिकाणी उष्माघाताची देखील संभावना आहे. अशातच कोकण विभागात 17 मार्च रोजी हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : लेकाच्या समलैंगिक प्रेमसंबंधाला विरोध, प्रियकराने मित्राच्या आईला संपवलं, पुढे भयंकर...
कोकण
कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट असेल असा हवामानाने अंदाज जारी केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवली आहे. तसेच रायगडमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा या जिल्ह्यात हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, नंदूरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील काही तुरळक भागांत
उष्णतेच्या लाटेचा अंदाज जारी केलाय, तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.









