पुण्याची गोष्ट : धूळ खात पडलेल्या वाहनांवर कारवाई होणार, पुणे वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर

मुंबई तक

Pune News : पुणे शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर गरज नसताना दीर्घकाळ धुळ खात पडलेली वाहने आपण पाहिली असतीलच. याच वाहनांबाबत आता पुणे वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई होणार आहे. धूळ खात पडलेली वाहने एकाच ठिकाणी ठेवल्यास त्यावर मोठी कारवाई केली जाईल. संबंधित वाहनांबाबत नोटीस पाठवले जाईल, त्यानंतर तात्काळ वाहन हटवावे नाही,तर त्या वाहनास बेवारस घोषित केले जाईल.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
google news

बातम्या हायलाइट

point

धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई

point

पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

पुण्याची गोष्ट : पुणे शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर गरज नसताना दीर्घकाळ धुळ खात पडलेली वाहने आपण पाहिली असतीलच. याच वाहनांबाबत आता पुणे वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई होणार आहे. धूळ खात पडलेली वाहने एकाच ठिकाणी ठेवल्यास त्यावर मोठी कारवाई केली जाईल. संबंधित वाहनांबाबत नोटीस पाठवले जाईल, त्यानंतर तात्काळ वाहन हटवावे नाही,तर त्या वाहनास बेवारस घोषित केले जाईल. अशा वाहनांना जप्त करून नंतर सुरक्षित ठिकाणी नेले जाईल. पुण्यातील वाढत्या वाहतूकीने वाहतूककोंडी निर्माण होत असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.  

हे ही वाचा : शेजारणीचं 5 वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराच्या होणाऱ्या बायकोवर प्रेयसीनं फेकलं ॲसिड, वधू वेदनेनं विव्हळू लागली

धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई

पुण्यात वाढत्या वाहतुकीचा नागरिकांना मोठा त्रास होतो, या धूळ खात पडलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. याच प्रकरणात वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. वाहनचालकांना सूचना देऊनही वाहन हलवले जात नसल्यास अशी वाहने बेवारीस असल्याची घोषित केली जातील. नोटीस देऊनही जर वाहन न हलवल्यास थेट पुणे वाहतूक पोलिस कारवाई करत वाहन जप्त करतील. या प्रकरणी पोलिसांनी थेट पुणेकरांना इशारा दिला आहे. 

वाहतूक कोंडीचे निरसन करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

शहरातील प्रमुख मार्गांसह विविध भागांवरील रस्त्यांच्या कडेला विनाकारण धूळ खात पडलेल्या चार चाकी किंवा दुचाकी पडलेली वाहने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळेच वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होते, हे दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. या महिमेत वाहनमालकांना आधी नोटीस दिली जाईल, पुढील 24 तासांमध्ये वाहन न हलवल्यास ते बेवारीस घोषित केलं जाईल. तसेच 48 तासांमध्ये वाहन जप्त केले जाईल, वाहन जप्तीनंतर ते मिळवण्यासाठी दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

तसेच संबंधित वाहनचालकांना पोलिसांनी पीटीआयच्या माध्यमातून माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बेवारस वाहनांसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली.  

हे वाचलं का?