शेजारणीचं 5 वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराच्या होणाऱ्या बायकोवर प्रेयसीनं ॲसिड फेकलं, वधू वेदनेनं विव्हळू लागली

मुंबई तक

crime news : विवाहस्थळी मेहंदीचा कार्यक्रम सुरु होता. भोवताली आनंदाचं वातावरण होतं, पण या आनंदाचे वातावरण एका घटनेमुळे बदलले. अचानकपणे भर मांडवात नवरदेवाची प्रेयसी घटनास्थळी आली, तिला पाहून सर्वजण हादरून गेले. कोणत्याही व्यक्तीला तिच्या येण्याची माहिती नव्हती. त्यादरम्यान, तिने आपल्या प्रियकराच्या होणार्‍या बायकोच्या अंगावर ॲसिड हल्ला केला. या घटनेनं परिसर हादरून गेलाची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याच्या प्रेयसीने नवरीवर केला ॲसिड हल्ला

point

वधू वेदनेनं विव्हळू लागली

Crime News : विवाहापूर्वी मेहंदीचा कार्यक्रम सुरु असताना एक भयंकर घटना घडली. भोवताली आनंदाचं वातावरण क्षणार्धात बदललं. नवरदेवाची प्रेयसी घटनास्थळी आली, तिला पाहून सर्वजण हादरून गेले. कोणत्याही व्यक्तीला तिच्या येण्याची माहिती नव्हती. त्यादरम्यान, तिने आपल्या प्रियकराच्या होणार्‍या बायकोच्या अंगावर ॲसिड हल्ला केला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त समोर आले. 

हे ही वाचा : Govt Jobs : इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, लगेच अर्ज करा; 'इतका' मिळणार पगार

नवऱ्याच्या प्रेयसीने नवरीवर केला ॲसिड हल्ला

वधू वेदनेनं विव्हळू लागली, ज्यामुळे भर मांडवात एकच गोंधळ उडाला. तिला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले, अशातच डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तिचे डोळे, चेहरा, मान आणि हात भाजून निघाला. पोलिसांच्या माहितीनुसार, ऑसिड हल्ल्यातील पीडितेचं लग्न 19 एप्रिल रोजी होणार होते. मात्र, मंगळवारी 14 एप्रिल रोजी ही घटना घडल्याने स्वप्नांचा चक्काचूर झाला. 

वधू वेदनेनं विव्हळू लागली

दुपारी साडेबारा वाजता पीडिता इंदिरा विहार येथील तिच्या घरी होती, मेहंदीचा कार्यक्रम सुरु असताना नवरदेवाची प्रेयसी तिथे आली. इतरांच्या लक्षात येण्यापूर्वी, तिने वधूवर ॲसिड हल्ला केला. वधू वेदनेनं विव्हळू लागली होती. काय घडलं हे तिच्या कुटुंबीयांना सुचत नव्हते. पोलिसांच्या माहितीनुसार, मेहंदी समारंभात दोघींमध्ये संभाषण सुरू होते. तिने मेहंदी कशी लावायची याबाबतची माहिती दिली. नंतर अचानक तिने बाटली उघडली आणि नवरी मुलीवर ॲसिड फेकलं. 

या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला होता. वधू वेदनेनं विव्हळू लागल्यानंतर मदतीसाठी कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. काही लोकांनी 26 वर्षीय आरोपी तरुणीला पकडून तात्काळ पोलिसांना बोलावले. जखमी झालेल्या वधूला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासातून समोर आले की, त्या दोन मुली शेजारी आहेत. 

हे वाचलं का?