Maharashtra Weather : सूर्यदेव आग ओकणार, 'या' 15 जिल्ह्यांचं खरं नाही, IMD चा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात दिवसेंदिवस अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. उष्णतेचा पारा अधिक वाढताना दिसतोय. राज्यातील 15 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. दरम्यान, 16 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घ्या.  

ADVERTISEMENT

maharashtra weather update 11 april 2026 dry hot and clear weather temperatures set to rise observatory issues warning of humid conditions
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात दिवसेंदिवस अंगाची लाही लाही

point

उष्णतेचा पारा अधिक वाढताना दिसतोय

point

एकूण हवामानाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात दिवसेंदिवस अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. उष्णतेचा पारा अधिक वाढताना दिसतोय. राज्यातील 15 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. यामुळे काही ठिकाणी उष्मघाताचं संकट आहे. अशा स्थितीत दुपारी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. दरम्यान, 16 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घ्या.  

हे ही वाचा : डोळ्यात अंगार, नामदेव ढसाळांचा झंझावात मोठ्या पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

कोकण 

कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. या विभागातील मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या भागांत अधिक उष्णता असणार आहे. या विभागात दमटपणामुळे उकाड्याचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा पारा अधिक वाढलेला आहे. नागरिकांच्या अंगाची लाही लाही होण्याची संभावना आहे. दुपारी वेळेतच बाहेर पडावं अशी नागरिकांनी काळजी घेण्याबाबतचे आवाहन केलं. सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा या विभागात उष्णतेची लाट पसरणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील लोकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. या भागांत उन्हाचा तडाखा अधिक तीव्र राहण्याचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला. 

हे वाचलं का?