लातूरमध्ये संपत्तीवरून वाद, दुसऱ्या बायकोच्या 7 वर्षीय मुलाची बापानं केली हत्या

Latur crime news : लातूरमध्ये संपत्तीवरून नवऱ्याने आपल्याच सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. लातूर शहरातील सूल गल्लीतील ही दुर्दैवी घटना आहे, या घटनेनं परिसर हदरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Latur crime news
Latur crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

संपत्तीवरून नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलाची हत्या

point

आरोपी बापाला परभणीतून अटक

Latur Crime News : अनिकेत जाधव - लातूरमध्ये संपत्तीवरून नवऱ्याने आपल्याच सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. लातूर शहरातील सूल गल्लीतील ही दुर्दैवी घटना आहे. आरोपीची ओळख युसूफ मुबारक सय्यद वय 58) अशी समोर आली, युसूफच्या दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीला दोन मुलं आहेत, तर दुसऱ्या पत्नीला सात वर्षांचा अरमान नावाचा मुलगा होता. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर: रोहित पठारे तरुणाला अमानुष मारहाण अन् मृत्यू, 10 जण अटकेत

दुसऱ्या पत्नीने अरमानच्या नावाने नवऱ्याकडे संपत्तीचा हिस्सा मागितला होता. याच मुद्द्यावरून नवरा-बायकोत सतत वाद व्हायचा. याच वादातून 5 नोव्हेंबर 2026 रोजी युसूफ आपल्या सात वर्षांचा मुलगा आरमानला घेऊन घराबाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. यानंतर दुसऱ्या पत्नीने आपला मुलगा हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सात वर्षांच्या आरमानचा मृतदेह

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, त्यांनी युसूफच्या घराजवळील सर्वच सीसीटीव्ही तपासले, ज्यात युसूफ मुलाला घेऊन घरामागील शेतात घेऊन जाताना दिसत आहे. एका तासानंतर तो ज्या रस्त्याने गेला त्याच रस्त्याने घरी परतताना दिसला होता, मात्र त्याच्यासोबत आरमान नव्हता. या घटनेच्या दोन दिवसांनंतर सात वर्षांच्या आरमानचा मृतदेह आढळून आला होता. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना सतावेल चिंता, 12 राशींचे जाणून घ्या भविष्य

आरोपी बापाला परभणीतून अटक

या घटनेनंतर आरोपी युसूफ हा मोबाइल बंद करून पळून गेला होता. सीसीटीव्हीत युसूफ दिसत असून तोच नेमका कसा काय ऐनवेळी पळून गेला? असा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे पोलिसांना देखील युसूफवरच संशय निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी परभणीहून अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.