डोळ्यात अंगार, नामदेव ढसाळांचा झंझावात मोठ्या पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका
Namdeo Dhasal Biopic: दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर 'ढसाळ' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या प्रतिक्षेतला आता पूर्णविराम मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. मुंबईमध्ये असंख्य उपस्थित लोकांच्या सवमेत हा भव्य सोहळा पार पडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मराठी आणि हिंदी भाषेत 'ढसाळ' चित्रपट रिलीज
लेखन आणि दिग्दर्शन कोणी केलं?
Namdeo Dhasal Biopic: दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर 'ढसाळ' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या प्रतिक्षेतला आता पूर्णविराम मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. मुंबईमध्ये असंख्य उपस्थित लोकांच्या सवमेत हा भव्य सोहळा पार पडला. दरम्यान, या चित्रपटात नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता ललित प्रभाकर याचं नाव समोर आल्याची माहिती समोर आली.
मराठी आणि हिंदी भाषेत 'ढसाळ' चित्रपट रिलीज
ढसाळ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. ललित प्रभाकरच्या लूकची झलक देखील समोर आली. ढसाळ यांचा करारा अंदाज त्या पोस्टरमधून दिसून येतोय. त्याच्या या भूमिकेन असंख्य लोकांचे लक्ष वेधलं गेलं आहे. नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील बंडखोरपणा आणि त्यांनी घेतलेली भूमिका या चित्रपटात दिसणार आहे. ढसाळ यांची भूमिका ललित प्रभाकर कशा पद्धतीने साकारेल याकडे अवघ्या जणांचे लक्ष लागलं आहे.
नामदेव ढसाळ यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या जगण्यातील ज्वलंतपणा, वास्तववाद यांचं चित्रण बघायला मिळेल. कवितेतील भावना या चित्रपटात दिसून येतील, लेखणीतून पेटलेली क्रांती आणि समाजमानाला हादरवून टाकणारे विचार यांचा ठसा उमटवण्यासाठी हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरेल.
'या' दिवशी 'ढसाळ' चित्रपट होणार रिलीज
'ढसाळ' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केलं, तसेच या चित्रपटाचे संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिलेत. दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांनी या चित्रपटाला संगीत दिले, तसेच इरशाद कामिल आणि गुरु ठाकूर यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. ललित प्रभाकरने स्वत:च्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. दरम्यान, 'ढसाळ' हा सिनेमा येत्या 1 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वत्र रिलीज होईल.









