Govt Jobs : सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

इंडियन ओव्हरसीज बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदासाठी भरती सुरु केली आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

IOB Recruitment
IOB Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी

point

40 हजारांहून अधिक पगार

IOB Recruitment : इंडियन ओव्हरसीज बँकेने स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer - JMGS I) पदांच्या एकूण 250 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

पात्रतेचे निकष काय?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून, अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) वर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट लागू राहील. अर्जासाठी सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : तरुणानं अंघोळीचा व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग अन्..

अर्जाची अंतिम मुदत

पात्र उमेदवारांना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून (www.iob.bank.in) ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना बँक सेवेत रुजू झाल्यापासून 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. तसेच नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना बँकेमध्ये किमान 3 वर्षे सेवा देण्याबाबतचा 2,00,000 चा सेवा बंधपत्र (Indemnity Bond) लिहून देणे अनिवार्य राहील.

हे ही वाचा : जालना हादरलं! भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन महिलांचा दुर्दैवी अंत

पगार किती?

या पदासाठी निवड झालेल्या सहाय्यक व्यवस्थापक (Scale I) अधिकाऱ्यांना 48,480 ते 85,920 रुपये या वेतनश्रेणीनुसार मूळ वेतन (Basic Pay) दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर भरपाई भत्ता (CCA) आणि इतर सर्व भत्ते बँकेच्या नियमानुसार लागू राहतील. तसेच रजा आणि प्रवास भत्ता या सुविधा देखील बँकेच्या सेवानियमांनुसार पुरवल्या जातील.