45 वर्षीय महिलेचा 25 वर्षीय प्रियकराकडे लग्नासाठी तगादा, अखेर संतापाच्या भरात केलं कांड
राजकोट जिल्ह्यात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या 45 वर्षीय महिलेच्या मृतदेहाला सुरुवातीला अपघात मानले जात होते, मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचे उघड झाले. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या तिच्या 25 वर्षीय प्रियकराने तिला रेल्वे रुळाजवळ बोलावून येणाऱ्या ट्रेनसमोर ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
45 वर्षीय महिलेचा 25 वर्षीय प्रियकराकडे लग्नासाठी तगादा
अखेर संतापाच्या भरात केलं कांड
Crime News : गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या 45 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे प्रकरण अपघाताचे नसून हत्येचे असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुरुवातीला हा ट्रेनचा अपघात मानला जात होता, परंतु रेल्वे पोलिसांचा तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय महिलेने लग्नासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून तिच्या 25 वर्षीय प्रियकरानेच तिचा खून केला. आरोपी प्रकाश सोलंकी याने महिलेला गोंडल येथील गुंडाळा रेल्वे ट्रॅकजवळ भेटण्यासाठी बोलावले होते.
सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक उलगडा
4 ऑगस्ट रोजी गोंडल येथील गुंडाळा फाटकाकडून सांधिया पुलाकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळ महिलेचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेच्या पाकीटात तिच्या मुलाचा मोबाईल नंबर सापडला, ज्याच्या आधारे कुटुंबाशी संपर्क साधून तिची ओळख पटवण्यात आली. मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहून फॉरेन्सिक पोस्टमाॉर्टमसाठी मृतदेह राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेचा मृत्यू अपघातात नसून हत्या झाल्याची पुष्टी केली. त्यानंतर रेल्वे स्टेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, 3 ऑगस्टच्या रात्री 11.30 च्या सुमारास आरोपी प्रकाश सोलंकी आणि ही महिला गोंडल रेल्वे स्टेशनवर एकत्र जाताना दिसले.
हे ही वाचा : 2023 च्या सुप्रीम कोर्ट निकालात काय होतं, ज्याचा दाखला ठाकरे अजूनही सुप्रीम कोर्टात देतात?
चालत्या ट्रेनसमोर ढकलले
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपी प्रकाश सोलंकीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिली. दोघेही रेल्वे ट्रॅकवर काही वेळ एकत्र बसले होते. 4 ऑगस्टच्या रात्री 1.30 वाजेच्या सुमारास ट्रेन येत असल्याचे पाहून आरोपीने प्रथम महिलेला ट्रॅकवरून दूर होण्यास सांगितले आणि नंतर तिला चालत्या ट्रेनसमोर ढकलून दिले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्याची साखळी स्पष्ट करण्यासाठी त्याला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचे री-कन्स्ट्रक्शन (दृश्य पुनर्रचना) देखील करून घेतले आहे.
हे ही वाचा : भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा? दिपके हसले, काय बोलून गेले?
4 मुलांच्या आईचा लग्नासाठी हट्ट
मृत महिला गेल्या अडीच वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि गोंडलमध्ये एकटी राहून हॉटेल व केटरिंगमध्ये स्वयंपाकाचे काम करत होती. तिला दोन मुले आणि दोन मुली असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. काही काळापूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 45 वर्षीय महिला आरोपीकडे लग्नासाठी हट्ट धरत होती, परंतु आरोपीचे कुटुंब तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. महिलेने लग्नाचा दबाव चालूच ठेवल्याने प्रकाश सोलंकीने तिच्या हत्येचा कट रचला आणि भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिला ट्रेनसमोर ढकलून दिले.
