"चाणक्य आज जिवंत असते तर त्यांनाही धक्का बसला असता...", त्या टोमण्यावर अमित शाहाही गदागदा हसले!

मुंबई तक

Priyanka Gandhi Criticized Amit Shah: लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान राजकीय गदारोळातही हलकेफुलके वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यासाठी चाणक्याचे नाव घेतल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

ADVERTISEMENT

if chanakya were alive today even he would be stunned congress mp priyanka gandhi jibe at amit shah loksabha mp echoes with laughter
अमित शाह (फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)
google news

नवी दिल्ली: लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विनोदी टोला लगावला, ज्यामुळे अमित शाहा यांनाही आपलं हसू रोखता आलं नाही. वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'काँग्रेस महिला खासदारांच्या आरक्षणाचे समर्थन करते, परंतु  या विधेयकात राजकारणाचा वास येत आहे.'

प्रियंका गांधी म्हणाल्या की, महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा केंद्रातील एनडीए सरकारसाठी एक राजकीय हुकमी पत्ता आहे, ज्याचा वापर करून ते निवडणुकीत फायदा मिळवू पाहत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पूर्वीच्या भाषणाचा संदर्भ दिला, ज्यात ते म्हणाले होते की, भाजप महिलांच्या हक्कांचा पुरस्कर्ता राहिला आहे. बोलताना प्रियंका यांनी अमित शाह यांच्याकडे पाहिले आणि ते हसत होते.

यामुळे प्रियंका गांधीही खळखळून हसल्या. त्या म्हणाल्या, "ते हसत आहेत... गृहमंत्री हसत आहेत. तुम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. जर चाणक्य आज जिवंत असते, तर त्यालाही धक्का बसला असता आणि त्यांनी तुमच्या धूर्तपणाचे कौतुक केले असते." त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांमध्येही हास्यकल्लोळ झाला. प्रियंका गांधी आणि अमित शाहा हेही हसत होते. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी आरोप केला की, सरकार निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या संस्थांवर दबाव आणत आहे.

प्रियंका गांधी यांनी असाही प्रश्न विचारला की, विद्यमान 543 लोकसभा जागांसाठी 33 टक्के आरक्षण का दिले जाऊ शकत नाही. त्या म्हणाल्या, "जर हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तर या देशातील लोकशाही संपुष्टात येईल." प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले होते की, महिला आरक्षणाच्या या निर्णयाला नेहमीच विरोध झाला आहे.

हे वाचलं का?