अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणी आरोपीचा खळबळजनक खुलासा, 'त्या' फ्लॅटमध्ये काय घडलं?

मुंबई तक

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नव्याने काही खुलासे झाले आहेत.

ADVERTISEMENT

Amravati Video Scandal
Amravati Video Scandal
google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणी खळबळजनक खुलासा

point

'त्या' फ्लॅटमध्ये काय घडलं?

Amravati Video Scandal, धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 'त्या' फ्लॅटमध्ये व्हायचा अत्याचार

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील एका नामांकित रेसिडेन्सीमधील फ्लॅटवर घेऊन जात असे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटमध्ये आरोपी तरुणींवर बलात्कार करून त्यांचे चित्रीकरण करत असे. या अश्लील व्हिडिओच्या जोरावर तो तरुणींना धमकावत असल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

हे ही वाचा : समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?

सहकाऱ्याला 500 रुपये देऊन..

या गुन्ह्यात मुख्य आरोपीला त्याच्या एका साथीदाराने मोलाची साथ दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी आपल्या साथीदाराला प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन या कामात मदत घेत असे. या फ्लॅटशी संबंधित असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून, या फ्लॅटमध्ये वारंवार वेगवेगळ्या तरुणींना आणले जात असल्याने हे एक मोठे संघटित रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : Personal Finance: कर्ज घेणं वाढलं अन् बचत कमी, भारतीयांच्या 'या' सवयींची नवी आर्थिक कहाणी

पोलिसांचे नागरिकांना आवाहन आणि तपास

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटची झाडाझडती घेतली आणि परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात आणखी किती तरुणी बळी पडल्या आहेत आणि यात मोठ्या गुन्हेगारी टोळीचा हात आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, अशा प्रकारच्या त्रासाला बळी पडलेल्या तरुणींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
 

हे वाचलं का?