अक्षय्य तृतीयेच्या आधी शनी करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींसाठी सुरु होणार सुवर्णकाळ
अक्षय्य तृतीयेपूर्वी होणारे शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान मानले जात असून ते शुभ परिणाम घेऊन येणार आहे. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे आणि त्याच्या बरोबर 2 दिवस आधी, 17 एप्रिल रोजी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अक्षय्य तृतीयेच्या आधी शनी करणार नक्षत्रपरिवर्तन
'या' राशींसाठी सुरु होणार सुवर्णकाळ
Shani Naksahtra Parivartan 2026 : ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, अक्षय्य तृतीयेपूर्वी होणारे शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान मानले जात असून ते शुभ परिणाम घेऊन येणार आहे. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे आणि त्याच्या बरोबर 2 दिवस आधी, 17 एप्रिल रोजी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. या दिवशी शनिदेव उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील आणि 17 मे पर्यंत याच नक्षत्रात राहतील. शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे, ते जाणून घेऊया.
'या' राशींवर होणार शनीची कृपा
वृषभ : शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक संकेत घेऊन येऊ शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मेहनतीचे फळ मिळू लागेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अडकलेले धन देखील परत मिळू शकते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : सूर्यदेव आग ओकणार, 'या' 15 जिल्ह्यांचं खरं नाही, IMD चा अलर्ट
मिथुन : हा काळ तुमच्यासाठी संतुलन आणि यश घेऊन येऊ शकतो. भागीदारीत लाभ होईल. नवीन करार मिळू शकतात. नात्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळेल. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता.
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळण्याचे योग आहेत. दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल.









