15 वर्षीय चुलत भावाने साडे तीन वर्षांच्या चुलत बहिणीला सोडलं नाही, आई बाहेर गेल्यानंतर नको तेच... गुप्तांगाला झाली जखम

मुंबई तक

crime news : आई रेशन आणण्यासाठी घराबाहेर पडली होती, त्याचदरम्यान 15 वर्षीय चुलत भावाने साडे तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला, आई घरी पोहोचताच पीडितेचं गुप्तांग जखमी झालं. या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

beed crime 13 year old boy sexually assaults two and a half year old girl second such incident in a week
प्रातिनिधिक फोटो
google news

बातम्या हायलाइट

point

चुलत भाऊच नराधम झाला

point

साडे तीन वर्षांच्या बहिणीवर केले लैंगिक अत्याचार

Crime News : बिहारच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात चुलत भाऊच नराधम झाला. 14 एप्रिल 2026 रोजी किशोर (वय 15) याने आपल्याच साडे तीन वर्षांच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला, या घटनेनं पीडितेच्या गुप्तांगाला जखमा झाल्या. संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने बुधवारी पोलीस ठाणे गाठून दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत आरोपी किशोरला ताब्यात घेतले आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : 'तुमची मुलगी गरोदर...', पोटात येऊ लागल्या कळा, नराधमाकडून 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पीडितेवर चुलत भावाकडून लैंगिक अत्याचार 

पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितलं की, 14 एप्रिल रोजी ती रेशन आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्याचदरम्यान, मुलीला घरी बोलावले, आई घरी येताच मुलगी ही तिच्या आजीजवळ बसली होती, तिचं गुप्तांग जखमी झालं होतं. आरोपीच्या घरी जाऊन तक्रार केली असता, त्यांनी मुलीवर उपचार करू असं सांगितलं. एसआई श्वेता कुमारी यांनी सांगितलं की, या प्रकरणाची एफएसएलच्या पथकाने माहिती मिळवली. प्रभारी ठाणेदार कृष्णकांत मिश्रा यांनी आरोपीची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं.

किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनेची पुनरावृत्ती 

दरम्यान, कर्जा पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील तीन वर्षांपूर्वी एका 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोषी ठरलेल्या दोन तरुणांना चार वर्षांच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा झालेल्यांमध्ये राजकिशोर महातो (वय 28) आणि सीतम कुमार महातो (वय 23) यांचा समावेश असून, त्यांना प्रत्येकी 200 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला. सुनावणीनंतर, विशेष पॉक्सो न्यायालय क्रमांक 2 चे न्याय‍धीश रामजी सिंग यादव यांनी बुधवारी शिक्षा सुनावली. 

विशेष न्यायलयाने बिहार नुकसान भरपाई कायद्यांतर्गत पीडितेला एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवली. फिर्यादीकडून सरकारी वकील रामेश्वर साह यांनी न्यायालयासमोर आठ साक्षीदारांना समोर आणले. पोलिसांनी तिसरा आरोपी राहुल कुमारविरोधात आरोपपत्र दाखल करत स्वतंत्रपणे खटला सुरु ठेवला. 

हे वाचलं का?