Nashik TCS: 'दानिशकडून आधी Kiss... नंतर शारीरिक संबंध, तर तोसिफ ऑफिसमध्येच कंबर पकडायचा', पीडितेचा हादरवणारा जबाब
TCS Scam: नाशिक TCS बीपीओ प्रकरणातील पहिल्या पीडितेचा जबाब समोर आला असून, त्यात नोकरीच्या बहाण्याने मैत्री, जबरदस्तीने संबंध, धर्मांतरासाठी दबाव आणि ब्लॅकमेल यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिकमधील TCS बीपीओ कॅम्पसशी संबंधित कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील पहिल्या पीडितेचा जबाब आता समोर आला आहे. या जबाबात मैत्री, नोकरीचे आमिष, लग्नाची खोटी आश्वासने, जबरदस्तीने संबंध, धर्मांतरासाठी दबाव आणि वैयक्तिक छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडितेने आज तक/इंडिया टुडेला 2022 ते 2026 पर्यंतच्या घटनांचा संपूर्ण क्रम सांगितला असून, त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे.
पीडितेचा हादरवून टाकणारा जबाब
पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती दानिश शेखला जानेवारी 2022 मध्ये भेटली होती. ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, त्यामुळे त्यांची लवकरच मैत्री झाली. दानिश कामाच्या निमित्ताने तिला वारंवार भेटायला यायचा आणि त्यांच्यातील संभाषण हळूहळू वाढत गेले. याच काळात, दानिशने एका कंपनीत इंजिनिअर असल्याचे भासवून पीडितेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला आणि ते दोघे अधिक जवळ आले.
यानंतर, दानिशने पीडितेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करणे सुरूच ठेवले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर, दानिशच्या सल्ल्यानुसार पीडितेने एका बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. दानिशसुद्धा त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे, त्यांचे संवाद आणि संपर्क सुरूच राहिले. याच काळात दानिशचे मित्र, तोसिफ अख्तर आणि निदा खान, हेदेखील त्यांच्यात सामील झाले आणि ते अनेकदा कॅन्टीनमध्ये किंवा बाहेर एकत्र वेळ घालवत असत.
हे ही वाचा>> TCS Scandal: देशाला हादरवून टाकणारे खुलासे, नाशिकमधील अंडरकव्हर ऑपरेशन... महिलांसोबत नेमकं घडलं तरी काय?
पीडितेच्या म्हणण्यानुसार, याच काळात धर्माबद्दल चर्चा सुरू झाली. दानिश आणि तोसिफ अनेकदा हिंदू धर्म आणि इस्लाममध्ये फरक दाखवत आणि आपला धर्म श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत. त्यांनी हिंदू चालीरीती आणि श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू, या संभाषणांचे रूपांतर दबावात झाले आणि पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी वाढता दबाव येऊ लागला.









