वृद्ध भिकाऱ्याची हत्या करुन रेल्वे स्टेशनच्या शेडमध्ये जाळला मृतदेह, निलंबित पोलीसाचे कृत्य; नेमकं कारण काय?

मुंबई तक

एका पोलिसाने वृद्ध भिकाऱ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळला आहे. याप्रकरणी आरोपी पोलीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने हे कृत्य का केले, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

वृद्ध भिकाऱ्याची हत्या करुन रेल्वे स्टेशनच्या शेडमध्ये जाळला मृतदेह

point

निलंबित पोलीसाचे कृत्य

point

नेमकं कारण काय?

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली असून, यामध्ये एका बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी एका भिकाऱ्याची हत्या केली. हे प्रकरण हाथरस जिल्ह्यातील असून, पोलिसांनी आरोपीला अटक करून संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी ईशान्य रेल्वेच्या हाथरस रोड हॉल्टजवळ एका टीन शेडखाली एका अज्ञात वृद्धाचा जळालेला मृतदेह सापडला होता. प्राथमिक तपासात ही बाब संशयास्पद वाटल्याने शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला.

'असा' रचला बनाव

तपासादरम्यान समोर आले की, ही हत्या 55 वर्षीय रामवीर सिंह याने केली होती. रामवीर हा पूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांत शिपाई म्हणून कार्यरत होता, मात्र गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवीरने एका भिकाऱ्याला लक्ष्य केले, त्याची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर त्याने स्वतःचे ओळखपत्र आणि वैयक्तिक वस्तू मृतदेहाजवळ ठेवल्या, जेणेकरून पोलीस आणि लोकांना तो स्वतः मेला असल्याचे वाटावे.

हे ही वाचा : 'आईची अवस्था बघवत नाही..' आजारी आईला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून संपवले; मुलगा काय म्हणाला?

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

मात्र, तपासादरम्यान असे काही पुरावे मिळाले ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्याचा उलगडा करत 14 एप्रिल रोजी आरोपीला मैनपुरी जिल्ह्यातील किशनी परिसरातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. त्याच्यावर फिरोजाबाद, अलीगड, मुरादाबाद, हरदोई, मैनपुरी आणि बदायूं यांसह अनेक जिल्ह्यांत अपहरण, हत्या, लूटमार आणि फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

हे ही वाचा : अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणी आरोपीचा खळबळजनक खुलासा, 'त्या' फ्लॅटमध्ये काय घडलं?

स्वत:ही होरपळला

या घटनेदरम्यान आरोपी स्वतःही होरपळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने आपल्या मृत्यूचा बनाव रचण्याची योजना का आखली होती, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 

हे वाचलं का?