बकरीवर लैंगिक अत्याचार करताना CCTV मध्येच दिसला विकृत तरूण, पोलिसांनी रंगेहाथच आवळल्या मुसक्या
फ्रान्समध्ये एका तरुणाला बकरीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जाणून घ्या काय आहे प्रकरण.
ADVERTISEMENT

पॅरिस: फ्रान्समधील एका गावात राहणारी एक महिला शेतकरीण तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे भयभीत झाली होती. शेती करण्यासोबतच, ती अनेक मेंढ्या आणि बकऱ्याही पाळते. तिच्या लक्षात आले की, रात्री उशिरा कोणीतरी तिच्या बकऱ्यांच्या वाड्यात शिरून त्यांच्यासोबत दुष्कृत्य करत होता.
या प्रकरणात, एका 19 वर्षीय तरुणाला त्या महिलेने तिच्या बकऱ्यांसोबत दुष्कर्म करताना रंगेहाथ पकडले. बकऱ्यांवर एकापाठोपाठ अनेकदा दुष्कृत्य केल्याच्या संशयावरून आरोपी तरूणाला अटक करण्यात आली. गुन्ह्याशी त्याचा संबंध जोडणारे डीएनए पुरावे असूनही, तो स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, दक्षिण फ्रान्समध्ये एक फार्म चालवणाऱ्या कॅसँड्राने सांगितले की, एक घुसखोर तिच्या बकऱ्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, गेल्या दोन महिन्यांपासून तिला नीट झोप लागत नव्हती. कॅसँड्रा सॉर्टिनो सांगते की, 11 फेब्रुवारी रोजी तिला या भयंकर गोष्टीबद्दल पहिल्यांदा समजले. तेव्हा तिच्या लक्षात आले की एका बकरीच्या पायाला दोरी बांधलेली आहे.
बकऱ्या झाल्या गंभीर जखमी
कॅसँड्राने स्पष्ट केले, "मला वाटले की कोणीतरी चोर असावा. पण पुढच्या काही आठवड्यांत, कॅसँड्राच्या लक्षात आले की तिच्या अनेक बकऱ्या रात्रभर बांधून ठेवलेले होते. त्या बकऱ्या भयंकर जखमांनी त्रस्त होते. मला वाटले की काहीतरी गडबड आहे आणि या जखमा नर बकऱ्यांमुळे होऊ शकत नाहीत." कॅसँड्राने या सर्व त्रासदायक घटनांची नोंद ठेवायला सुरुवात केली आणि अत्याचार झालेल्या सर्व प्राण्यांची स्थानिक पशुवैद्यकाकडून तपासणी करून घेतली.









