तिकिट हरवल्याचं सांगितलं अन् क्वार्टरवर नेऊन रेल्वे कर्मचाऱ्यानं तरुणीवर केला बलात्कार; नेमकं काय घडलं?
Crime News : मदतीच्या बहाण्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या या 26 वर्षीय पीडित तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. सोमवारी पहाटे रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने तिला आपल्या सरकारी क्वार्टरवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तिकिट हरवल्याचं सांगितलं अन् क्वार्टरवर नेऊन रेल्वे कर्मचाऱ्यानं तरुणीवर केला बलात्कार
नेमकं काय घडलं?
Crime News : मदतीच्या बहाण्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या या 26 वर्षीय पीडित तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. सोमवारी पहाटे रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने तिला आपल्या सरकारी क्वार्टरवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बिहारच्या सोनपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी रेल्वे कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
हे ही वाचा : बायकोला रील्स बनवण्याचं वेड, वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं; हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल
सामान अन् तिकीटाची चोरी
पीडित तरुणी नवी दिल्लीहून आपल्या गावी बक्सरला जाण्यासाठी जनसाधारण एक्सप्रेसमध्ये बसली होती. छप्रा मार्गे तिला सोनपूरला उतरायचे होते आणि तिथून बक्सरला जाण्याची तिची योजना होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव ट्रेन सोनपूरला न थांबल्याने ती हाजीपूरला पोहोचली. त्यानंतर रविवारी रात्री ती पुन्हा दुसऱ्या एका ट्रेनने सोनपूर स्थानकावर आली. प्रवासादरम्यान तिचे सामान आणि तिकीट हरवल्याने ती प्रचंड घाबरलेली होती आणि मदतीसाठी कोणाची तरी वाट पाहत होती.
पहाटे तीन वाजता अत्याचार
याच कठीण प्रसंगात सोनपूर स्थानकावर तिची भेट सुनील कुमार नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्याशी झाली. सुनीलने तिला मदतीचे आश्वासन दिले आणि सुरक्षिततेचे खोटे गाजर दाखवून तिला आपल्या सरकारी निवासस्थानी नेले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने तरुणीच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित तरुणीने हिंमत एकवटून तिथून पळ काढला आणि रस्त्यावर गस्त घालत असलेल्या पोलीस रक्षकांकडे धाव घेतली.










