"माझ्या गिफ्टचे पैसे वापरून पप्पांनी दुसरं लग्न केलं..." 10 वर्षांच्या मुलाने वडिलांवर केला गुन्हा दाखल!
एका व्यक्तीने आपल्या 10 वर्षांच्या मुलाला मिळालेल्या गिफ्टच्या पैशांचा वापर त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी केला, ज्यामुळे अल्पवयीन मुलाने वडिलांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"माझ्या गिफ्टचे पैसे वापरून पप्पांनी दुसरं लग्न केलं..."
10 वर्षांच्या मुलाने वडिलांवर केला गुन्हा दाखल!
Viral News: एका तरुणाने आपल्या 10 वर्षांच्या मुलाला मिळालेल्या गिफ्टच्या पैशांचा वापर त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी केला, ज्यामुळे अल्पवयीन मुलाने वडिलांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मुलाचं नाव शियाओहुई असून उत्तर चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झोऊ शहरातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून तो त्याच्या वडिलांसोबत राहत असल्याची माहिती आहे.
वडिलांनी संमतीशिवाय मुलाच्या गिफ्टचे पैसे काढले...
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलाच्या वडिलांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि या नवीन लग्नाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला नववर्षानिमित्त गिफ्ट म्हणून मिळालेले 80,000 युआन (11,500 अमेरिकी डॉलर्स) म्हणजेच अंदाजे 10.47 लाख रुपये काढून घेतले. हे पैसे वडिलांनी त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले आणि दुसरं लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या आईकडे पाठवलं. वडिलांनी आपल्या संमतीशिवाय खात्यातून सर्व पैसे काढले काढून ते त्यांच्या लग्नासाठी वापरल्याचं जेव्हा मुलाला कळलं तेव्हा त्याने पैसे परत करण्याची मागणी केली.
हे ही वाचा: पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनेने सासूच्या डोक्यात खलबत्ता घातला, किरकोळ वाद टोकाला पोहोचला अन् भयंकर घडलं
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील वृत्तानुसार, वडिलांनी आपल्या मुलाला पैसे देण्यास नकार दिला, कारण ते नातेवाईक आणि मित्रांकडून मिळालेल्या गिफ्टचे पैसे होते आणि मूल प्रौढ झाल्यानंतरच ते परत केले जाणार होते. यामुळे मुलाला इतकं वाईट वाटलं की त्याने त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला. मात्र, वडिलांनी असा दावा केला की मुलाच्या आईनेच त्याला प्रवृत्त केल्यामुळे त्याने हे कृत्य केलं.
न्यायालयाचा निर्णय
जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने असा निर्णय दिला की गिफ्टमध्ये मिळालेली रक्कम ही कायदेशीररित्या मुलाची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि परवानगीशिवाय पैसे काढून आणि वापरल्याने, वडिलांनी कायदेशीर पालक असूनही, मुलाच्या मालमत्ता हक्कांचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने वडिलांना मुद्दल आणि व्याजासह 82,750 युआन मुलाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.










