धाराशिव : काकाने पुतणीला गळा दाबून संपवलं, कोयत्याने तुकडे करुन मृतदेह चारीमध्ये पुरला, हत्येचं कारणही समोर

मुंबई तक

Dharashiv Crime : प्राथमिक तपासात आरोपीच्या भावाच्या पत्नीचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याच्या मनात संताप निर्माण झाला होता. तसेच पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय आल्याने रागाच्या भरात त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Dharashiv Crime News
Dharashiv Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : वहिनीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय

point

पुतणीला संपवून कोयत्याने तुकडे केले, बॉडी चारीमध्ये पुरली

Dharashiv Crime , गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील  तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत 13 महिन्यांच्या चिमुकलीचा तिच्याच चुलत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी (दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी) आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नं. 29/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे मुलीचा चुलता शंकररेश्वर माने याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा : मुलाच्या डोक्यात हातोड्याने ठोकला अडीच इंचाचा लोखंडी खिळा, वडील अन् भावाचं कृत्य; मुलाचं काय झालं?

चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास त्याने चिमुकलीला घरातून उचलून नेले. शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर कोयत्याच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले व जवळील चारीमध्ये पुरून टाकल्याची कबुली त्याने दिली. आरोपीने दाखवून दिलेल्या ठिकाणी दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp