Manoj Jarange: 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी फडणवीसांचा मोठा निर्णय, थेट आदेशचा आला समोर!

मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी SIT स्थापन केली आहे.

ADVERTISEMENT

manoj jarange 500 crore audio clip bjp leaders shiv sena eknath shinde devendra fadnavis sit probe shailesh balkawade
फडणवीस सरकारकडून एसआयटी स्थापन
Google CTA

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर आणलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिप प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड घडली आहे. या क्लिपची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज (26 ऑक्टोबर) यासंदर्भात आदेश जारी केला आहे. या पथकात कोणत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, याकडे लक्ष लागले आहे. 

SIT मध्ये कोणा-कोणाचा समावेश?

मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, या विशेष तपास पथकाच्या अध्यक्षपदी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी असेल.

हे ही वाचा>> 'अडीच वर्षानंतर हे संभाषण...' जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

तपासासाठी आवश्यकतेनुसार अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही SIT प्रमुखांना देण्यात आले आहेत. तसेच तपासात झालेल्या प्रगतीची माहिती वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश आदेशात आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय दावा?

22 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली होती. या क्लिपमध्ये काही व्यक्तींची नावे आणि पैशांच्या कथित व्यवहारांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला. त्यातील संभाषणात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा कथित उल्लेख असल्याचे वृत्त आहे. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा>> 'मनोज जरांगेंना पर्सनल टार्गेट करावं लागेल...', ऑडिओ क्लिपमधील 'ती' महिला कोण.. असं का म्हणतेय?

मात्र, या कथित व्यवहाराची किंवा ऑडिओ क्लिपमधील संभाषणाच्या सत्यतेची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

फॉरेन्सिक तपासातून काय स्पष्ट होणार?

या SIT कडून ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी, तिचा उगम शोधणे, संभाषणातील आवाज कोणाचे आहेत हे तपासणे आणि संबंधित तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाणार आहे. क्लिपमध्ये फेरफार झाला आहे का, संभाषणाचा संदर्भ काय आहे आणि कथित आर्थिक व्यवहारासंबंधी कोणते पुरावे उपलब्ध आहेत, याचा तपासात शोध घेतला जाऊ शकतो.

या प्रकरणातील आरोपांवरून संबंधित राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. त्यामुळे SIT च्या तपासातून ऑडिओ क्लिपची सत्यता आणि आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होते का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.