सरकारी नोकरीचे दाखवले आमिष, गेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार
Crime News : एका गेस्ट हाउसमध्ये लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीलवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अधिकारी अशी ओळख सांगून पीडितेशी केली ओळख
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार
Crime News : एका गेस्ट हाउसमध्ये लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीलवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित तरुणीने 112 या क्रमांकावर फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी गेस्ट हाउस संचालकाला ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी कुटुंबीयांना सूचना देऊन तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीच्या जबाबावरून तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी हा भोजपुर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : पैसे देण्यास तरुणाचा विलंब, पीडिताला मारहाण करून मूत्र पाजले
अधिकारी अशी ओळख सांगून पीडितेशी केली ओळख
पीडिताने पोलिसांना सांगितलं की, बस प्रवासादरम्यान आरोपीसोबत ओळख झाली होती. संबंधिताने सरकारी अधिकारी असल्याचे सांगत काही लोकांना नोकरी देण्याचा विश्वास दाखवला. ओळखीनंतर दोन आठवडे एकमेकांचे फोनवर बोलणे झाले. आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून तिला पटना येथे बोलावले होते.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार
पीडितेनं सांगितलं की, रविवारी कागदपत्र आणि प्रक्रियेबाबत बोलण्याच्या बहाण्याने सैनिक गेस्ट हाऊस येथे बोलावण्यात आले होते. संबंधित प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, संबंधित व्यक्तीने एका खोलीत नेत लैंगिक अत्याचार केला होता.
हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच बँक मॅनेजरची पत्नी कोसळली, 6 सेकंदात मृत्यू
या प्रकरणात पोलिसांनी गेस्ट हाउसचे संचालक अंकित कुमारला ताब्यात घेतले आणि प्रकरणाचा तपास केला. त्यांनी सांगितलं की, गेस्ट हाऊसच्या खोलीला सील करण्यात आले होते. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तक्रार दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि फरार आरोपीला अटक करण्यात आली.
