पैसे देण्यास तरुणाचा विलंब, पीडिताला मारहाण करून मूत्र पाजले

Crime News : वेळेवर कर्ज न फेडल्याने एका सावकाराने एका तरुणाचे अपहरण केले, त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेले आणि अमानुषपणे मारहाण केली. हे प्रकरण इथवरच न थांबता त्याला मुत्र प्रशान करण्यास भाग पाडले होते.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तरुणाने सावकाराकडून 70 हजार रुपये घेतले कर्ज

point

पैसे देण्यास विलंब झाल्याने तरुणावर अमानुष अत्याचार 

Crime News : वेळेवर कर्ज न फेडल्याने एका सावकाराने एका तरुणाचे अपहरण केले, त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेले आणि अमानुषपणे मारहाण केली. हे प्रकरण इथवरच न थांबता त्याला मुत्र प्रशान करण्यास भाग पाडले होते. सुदैवाने, एका वाटसरुच्या मदतीने पीडित तरुण तिथून निसटण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना कर्नाटकातील हावेरी येथील आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच बँक मॅनेजरची पत्नी कोसळली, 6 सेकंदात मृत्यू

तरुणाने सावकाराकडून 70 हजार रुपये घेतले कर्ज

हे प्रकरण हावेरी जिल्ह्यातील शिगगाव तालुक्यातील बांकापुरा गावातील आहे. घडलेल्या घटनेनुसार, पीडित माणिकांत एका बेकरीत काम करतो. त्याने अलीकडेच कामासाठी सावकाराकडून 70 हजार रुपये कर्ज घेतले होते. करारानुसार, तो दर आठवड्याला सावकाराल 1 हजार 500 ते 2 हजार रुपये व्याज देणार होता. मात्र, काही आठवड्यांपासून त्याला वैयक्तिक कारणास्तव ठरलेली रक्कम देणे शक्य झाले नाही. 

पैसे देण्यास विलंब झाल्याने तरुणावर अमानुष अत्याचार 

पीडिताच्या म्हणण्यांनुसार, 16 ऑक्टोबर रोजी आरोपीने अपहण केरे आणि त्याला निर्जनस्थळी नेत मारहाण केली. चार दिवस त्याला बांधून देखील ठेवण्यात आले होते. त्याला सिगारेटने चटके देखील देण्यात आले होते. इतकेच नाही,तर आरोपीने त्याच्या तोंडात लघवीसुद्ध केली होती. इतक्यात एक वाटसुरू घटनास्थळी आला आणि त्याने तरुणाला तावडीतून सोडवलं. 

हे ही वाचा : मुंबई: क्रूर बापानं नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं

पीडित तरुणाने आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर पीडित तरुणाची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी उपचारासाठी हावेरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.