इचलकरंजी : महापालिकेचा कर्मचारी झोपेत असताना पत्नीने डोक्यात खलबत्ता घातला, जागेवर मृत्यू

Ichalkaranji Crime News : इचलकरंजीत कौटुंबिक वादातून पत्नीने झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्त्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पत्नीने मुलीसह गावभाग पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

Ichalkaranji Crime News
Ichalkaranji Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

इचलकरंजी : महापालिकेचा कर्मचारी झोपेत असताना पत्नीने डोक्यात खलबत्ता घातला

point

पतीच्या मृत्यूनंतर पत्नी मुलीसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचली

Ichalkaranji Crime News :  इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीने झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्त्या घालून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी मुलीसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. मृत व्यक्तीचे नाव सागर दीपक बुरसे (वय 35) असून ते इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते. ते त्रिशूल चौक, गावभाग परिसरात राहत होते. 

हेही वाचा : भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?

कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद 

सागर आणि त्यांची पत्नी वैशाली बुरसे यांच्यात दारूच्या व्यसनावरून तसेच कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वादांमुळे दोघे काही काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा एकत्र राहू लागले होते. शनिवारी रात्री सागर नशेत घरी आले होते. यावेळी त्यांनी पत्नीला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र, रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास वैशालीने रागाच्या भरात झोपलेल्या सागर यांच्या डोक्यात खलबत्त्याने प्रहार केला.

हेही वाचा : कोल्हापूर : चुलत्याच्या घरातून सोनं चोरलं, Thar गाडी घेतली; अन् पुजेलाही त्यालाच बोलावलं!

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू 

या हल्ल्यात सागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पतीची हत्या केल्यानंतर वैशाली घरातच झोपली होती. त्यानंतर सकाळी ती आपल्या मुलीला घेऊन थेट गावभाग पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे तिने पोलिसांना पतीच्या डोक्यात खलबत्त्याने वार करून त्यांची हत्या केल्याचे सांगितले. वैशालीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने या घटनेची माहिती परिसरात पसरली. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे इचलकरंजी शहरात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर या घटनेला हिंसक वळण मिळाले.

दरम्यान, मृत सागर बुरसे यांच्या बहीण गायत्री रायबागकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गावभाग पोलीस ठाण्यात वैशाली बुरसे हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वैशालीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्येमागील नेमकी कारणे आणि घटनेशी संबंधित इतर बाबींची पोलीस चौकशी करत आहेत. पती-पत्नीमधील कौटुंबिक मतभेद, दारूच्या व्यसनावरून होणारे वाद आणि शनिवारी रात्री घडलेला प्रकार या पार्श्वभूमीवर पोलीस पुढील तपास करत आहेत.