पोलीसच नरेंद्र पवारला वाचवतायेत! काँग्रेस नेत्यांचा पोलिसांवर आरोप

Narendra Pawar Kalyan News : भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाला एक महिना लोटून गेला. मात्र, अद्यापही नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

Narendra Pawar Kalyan News
Narendra Pawar Kalyan News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसच्या पोलिसांवर मोठा आरोप 

point

अटकपूर्व जामिनाचा अर्जही फेटाळला

Narendra Pawar Kalyan News : भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाला एक महिना लोटून गेला. मात्र, अद्यापही नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात काँग्रेसचे कल्याण डोंबिवली गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांनी मोठा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास असून नरेंद्र पवार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सहा पथख काम करत आहेत. मात्र, अद्याप कशाचाही ठावठिकाणी लागलेला नाही. 

हे ही वाचा : सरकारी नोकरीचे दाखवले आमिष, गेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार

घडलेल्या घटनेनुसार, कल्याणमधील एका विवाहित महिलेनं मदत करण्याच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेला मदतीच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेल्याचा देखील आरोप करण्यात आला. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला. यासाठी तब्बल सहा पथके शोधासाठी पाठवण्यात आली. मात्र अद्यापही दोघांचा शोध लागलेला नाही. 

काँग्रेसच्या पोलिसांवर मोठा आरोप 

या प्रकरणात काँग्रेस सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेते. नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आरोपी नरेंद्र पवार यांना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही काँग्रेसकडून अद्याप कोणतेही आंदोलन करण्यात आलेले नाही. त्यामुळे नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना प्रश्न विचारले असताना त्यांनी सांगितले की, भारतात जिथे जिथे भाजप पदाधिकारी रेप केस मध्ये आढळले आहेत कोणालाही अटक झाली नाही, इथे नवीन वाटायला नकोय. कल्याण डोंबिवलीत... ज्या मुलीने आपला देशासाठी स्वर्ण पदक आणले, त्यांच्या आरोपींना अटक झाली नाही त्यांना क्लीन चीट दिली. उन्नावमध्ये देखील बलात्काराच्या आरोपीला अटक झाली नाही. हे पूर्ण भारतात सुरू आहे. यात माझ्या आरोप आहे की, पोलिसांच्या कामचुकारपणा यातून दिसून येत आहे. एखादी गरीब माणूस , एखादी मारामारी होऊ द्या घरातील त्याचा बायका पोरांना उचलून घेतात. का नाही अटक केला नरेंद्र पवारांच्या फॅमिलीला, का नाही अटक केला शैलेश पाटीलच्या फॅमिलीला... का तो फॅमिलीच्या संपर्कात नाही? पोलिसांना त्याला शोधायचे नाही आहे. भाजपच्या ताटा खालच्या मांजर म्हणून पोलिस अधिकारी काम करत आहे. अशा माझ्या स्पष्ट आरोप आहे. आम्ही पूर्ण देशात आंदोलन केला, तरी एकही आरोपीना अटक झाले नाही, आता आंदोलन केला तर उद्या नरेंद्र पवारला अटक  होणार का? नाही होणार.. आम्ही कागदा पत्र द्यायची ते जमा करायचे तहसीलदारांनी... हा पोलिसांच्या पूर्णपणे कामचुकारपणा आहे, पोलिसांना त्याला शोधायचे नाही आहे कुठे ना कुठे त्याला मदत केली जात आहे. माझ्या स्पष्ट आरोप आहे की पोलीस त्याला पाठीशी घालत आहे, एका गरीब माणसाकडून मारामारी होऊ द्या पोलीस त्याच्या परिवाराचे चार पिढिया अरेस्ट करतील, माहेरी जा सासरी जा... आता का नाही केली किती तपास सुरू आहे पोलिसांचा? पोलिसांनी सांगावं की ते कुठे कुठे गेले त्याला शोधायला? तो लगेच भेटणार पण पोलिस शोध घेत नाही आहे अशा माझा स्पष्ट आरोप आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले. 

हे ही वाचा : पैसे देण्यास तरुणाचा विलंब, पीडिताला मारहाण करून मूत्र पाजले

अटकपूर्व जामिनाचा अर्जही फेटाळला

या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्या वतीने भिवंडी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. तरीही नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाला एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत याकडे लक्ष लागलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे आणि पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.