41 वर्षीय मालकीणीवर लैंगिक अत्याचार, 'त्या' एका कारणाने तरुण घ्यायचा गैरफायदा, अखेर रंगेहाथ पकडले

मुंबई तक

Crime news : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील खेली येथे आयुष (वय 28) याने त्याच्या मालकाच्या 41 वर्षीय पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित पीडित महिला ही नैराश्यामुळे उपचार घेत होती, पीडित महिला ही औषधामुळे गाढ झोपी गेली होती, घरातील कामाची जबाबदारी असलेल्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला अनेक दिवसांपासून नैराश्यात 

point

तरुणाने गैरफायदा घेत मालकाच्या बायकोवर केला अत्याचार

point

पीडितेनं सांगितला घटनेचा थरार

Crime News : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील खीरी येथे आयुष (वय 28) याने त्याच्या मालकाच्या 41 वर्षीय पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित पीडित महिला ही नैराश्यात होती, त्यामुळे ती स्वत: उपचार घेत होती. पीडित महिला ही औषधामुळे गाढ झोपी गेली होती, घरातील कामाची जबाबदारी असलेल्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा : अकोला: अल्पवयीन मुलं ट्रिपल सीटने प्रवास करताना ट्रकने दिली धडक, तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे सख्खे भाऊ

आरोपीने जीवे मारण्याची दिली धमकी

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेनं औषध घेण्यास नकार दिला आणि आरोपीला रंगेहाथ पकडले. दरम्यान, तिने नकार दिला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, नंतर 23 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशातच 25 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

महिला अनेक दिवसांपासून नैराश्यात 

पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, ती बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने औषधे घेतली होती. यामुळे तिला गाढ झोप लागत होती. आरोपी आयुष हा तिच्या पतीच्या दुकानात काम करायचा आणि घरकामाला देखील मदत करायाचा. याचा फायदा घेत, ती बेशुद्ध पडली असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला. 

पीडितेनं सांगितला घटनेचा थरार

13 फेब्रुवारी रोजी महिलेनं औषध घेतले नव्हते, त्याचदरम्यान आरोपीने नेहमीप्रमाणे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्याला पकडून प्रतिकार केला. तेव्हा आरोपीने तिला गप्प राहण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेनं धाडस करत तिच्यावर झालेला अत्याचार पोलिसांना सांगितला, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली

हे वाचलं का?

    follow whatsapp