अकोला: अल्पवयीन मुलं ट्रिपल सीटने प्रवास करताना ट्रकने दिली धडक, तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे सख्खे भाऊ

मुंबई तक

Akola Accident : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाटा परिसरात झालेल्या परिसरातील भीषण अपघातात माळेगाव येथील अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना होळीच्या एक दिवस आधी शुक्रवारी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तेल्हाराकडे येणाऱ्या एका दुचाकीवरून तिघे अल्पवयीन मुले ट्रीपल सीटने प्रवास करत होते, त्याचदरम्यान आयशर ट्रकची दुचाकीला धडक लागली. या धडकेत तिघेही रस्त्यावर फेकले गेले, या दुर्दैवी घटनेत मुलांचा जागीच अंत झाला. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळ तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

point

ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात

Akola Accident : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाटा परिसरात झालेल्या परिसरातील भीषण अपघातात माळेगाव येथील अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना होळीच्या एक दिवस आधी शुक्रवारी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तेल्हाराकडे येणाऱ्या एका दुचाकीवरून तिघे अल्पवयीन मुले ट्रिपल सीटने प्रवास करत होते, त्याचदरम्यान आयशर ट्रकची दुचाकीला धडक लागली. या धडकेत तिघेही रस्त्यावर फेकले गेले, या दुर्दैवी घटनेत मुलांचा जागीच अंत झाला. 

हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

अपघातातील मृतांची नावे समोर 

या प्रकरणातील मृतांची नावे समोर आलेली आहेत. दर्शन रामेश्वर वैष्णव, साई रामेश्वर वैष्णव, गणेश दीपक आपतुरकर अशी मुलांची नावे आहेत. दर्शन आणि साई हे दोघे सख्खे भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातातील आयशर ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी तेल्हारा पोलीस येथे आणण्यात आला. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात केले. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुलकालवार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासातून तिन्ही मुले अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान ते एकाच दुचाकीवरून प्रवास करू लागले होते. 

हे ही वाचा : हतबल दीर धाय मोकलून रडला, डोळ्यासमोरच मित्रांनी वहिनीवर केला सामुहिक बलात्कार, कानाला बंदुक लावून...

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

या प्रकरणात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच वाहन ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, तिन्ही मुले माळेगाव येथील रहिवासी होती आणि तेल्हाराकडे येताना शेरी फाटा परिसरात अपघात झाला. या घटनेनं वैष्णव आणि आपतुरकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे, या घटनेनं माळेगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp