हतबल दीर धाय मोकलून रडला, डोळ्यासमोरच मित्रांनी वहिनीवर केला सामुहिक बलात्कार, कानाला बंदुक लावून...
Crime News Uttarakhand : निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. आरोपींनी दिराच्या कानाला पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हतबल दीर आपल्या वहिनीला सोडण्यासाठी नराधमांकडे गयावया करत होता, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने तिच्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हतबल दीर धाय मोकलून रडला
डोळ्यासमोरच मित्रांनी वहिनीवर केला सामुहिक बलात्कार
कानाला बंदुक लावून...
Crime News Uttarakhand ,रुद्रपूर (उत्तराखंड): उत्तराखंडमधील उधमसिंग नगर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रुद्रपूर येथे एका महिलेवर तिच्या दिरासमोरच त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी पीडितेच्या दिराच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला शांत बसण्यास भाग पाडले आणि महिलेवर अत्याचार केले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडित महिलेला शहरातील गांधी पार्क येथे सुरू असलेला 'सरस मेळा' पाहण्याची इच्छा होती. पतीने कामामुळे जाण्यास नकार दिल्यानंतर, महिला तिच्या दिरासोबत मेळावा पाहण्यासाठी गेली होती. मेळाव्यामध्ये दिराचे दोन मित्र, राजा (रा. खेडा) आणि करण (रा. भदईपुरा) यांची भेट झाली. सर्वांनी मिळून तिथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि गायक पवनदीप राजन यांचा कार्यक्रमही पाहिला. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान घरी परतत असताना, दोन्ही आरोपींनी 'शॉर्टकट' रस्त्याने नेण्याचे आमिष दाखवून त्यांना किच्छा बायपासजवळील 'ब्युटीफुल कंपनी'च्या एका निर्जन भागात नेले.
हेही वाचा : बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह! 4 दिवसांनंतर पाहिलं अन्...
दिरासमोरच केला अत्याचार
निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. आरोपींनी दिराच्या कानाला पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हतबल दीर आपल्या वहिनीला सोडण्यासाठी नराधमांकडे गयावया करत होता, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने तिच्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर राजा आणि करण या दोघांनी आळीपाळीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, नराधमांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसात गेल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.










