बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा
Baramati Crime News : बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मृत महिलेवर लैंगिक अत्याचार
आरोपीने हातोड्याने हल्ला करत केला खून
गुप्तांगावर आढळल्या जखमा
Baramati Crime News : वसंत मोरे - बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्घटना आहे. संबंधित प्रकरणात आरोपीची गणेश रामचंद्र माने (वय 26) अशी ओळख समोर आली. या घटनेने परिसर हादरून गेला.
हे ही वाचा : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल
मृत महिला गर्भवती
या प्रकरणात नराधम आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने देखील घेतले होते. शवविच्छेदन अहवालात मृत महिला ही गर्भवती असल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पिढीतेच्या सासूने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करत आरोपींनी खुनाचा गुन्हा दाखल केला. 12 सप्टेंबर रोजी पीडितेचा पती तानाजी रडत असायची माहिती शेजाऱ्यांनी तानाजीच्या आईला दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
त्यानंतर सासूने घर गाठले असता घरात सून मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ आले असता, तपास केला. या तपासादरम्यान आरोपी गणेश मानेबाबत घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने घटनेचा कबुलीनाम दिला.
गुप्तांगावर आढळल्या जखमा
महिलेवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला, नंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. आरोपीकडून हातोडा, कपडे व दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
