बायको परदेशातून परत आली अन् नवऱ्यानं केली हत्या, सासूलाही संपवलं
एका व्यक्तीने परदेशातून परतलेल्या आपल्या बायकोची आणि सासूची निघृण हत्या केली. नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा बायकोचा वाद
बायकोसह सासूला संपवलं
नेमकं काय घडलं?
Crime News : केरळममधील इडुक्की जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका 40 वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्याच पत्नीची आणि सासूची निर्घृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये आरोपीचा सासरा देखील गंभीर जखमी झाला असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने नेमकी हत्या का केली, जाणून घ्या.
कधी घडली घटना?
बुधवारी (21 ऑक्टोबर) रात्री ही धक्कादायक घटना घडली. प्रिन्स असे आरोपी पतीचे नाव आहे. मृत महिलांची ओळख आरोपी प्रिन्सची पत्नी प्रियंका (35) आणि सासू नेसम्मा (60) अशी पटली आहे. या हल्ल्यात प्रियंकाचे वडील इजरावेल (65) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शेजारील कोट्टायम जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती, 60 हजारांहून अधिक पगार
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स हा घरी पोहोचल्यानंतर त्याचा पत्नी प्रियंकासोबत जोरदार वाद झाला. वादाचे पर्यवसान हिंसेत झाल्यानंतर त्याने पत्नी आणि सासूवर धारदार हत्याराने वार केले.दरम्यान, मध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासऱ्यावर म्हणजेच इजरावेल यांच्यावरही त्याने जीवघेणा हल्ला केला. प्रियंका अलीकडेच एका खाडी देशातून (Gulf Country) केरळमला परतली होती आणि तिच्या परतीनंतरच या दांपत्यामध्ये कौटुंबिक कलह सुरू झाल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : गर्भवती पत्नीला जबरदस्तीने युरिया पाजला, नंतर गळफास देऊन आत्महत्येचा बनाव
आरोपी अटकेत
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा आणि कलम 109 (1) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रिन्सला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
