एका सरणावर आई अन् मुलगी, दुसऱ्या सरणावर मुलगा; 'या' गावात काय घडलं?

राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात ही भयानक घटना घडली. आईने पोटच्या लेकरांना कात्रीने वार करुन संपवले. त्यानंतर स्वत:वर देखील तिने वार केले. यामागे नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आईच बनली वैरी

point

पोटच्या लेकरांना संपवलं

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका कौटुंबिक वादातून अतिशय भयानक व मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उषा (28) या महिलेने संतापाच्या भरात घरातील धारदार कात्रीने आपल्याच दोन निष्पाप मुलांची, म्हणजेच तीन वर्षांची मुलगी नंदिता आणि चार वर्षाचा मुलगा मुकुल यांची गळा चिरून व शरीरावर वार करून हत्या केली. या अत्यंत क्रूर आणि दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावात एकाही घरी चूल पेटलेली नाही. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खेडली गावात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

कात्रीने वार करुन संपवले

हा भयानक प्रकार घडत असताना मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून उषाची बहीण व नणंद मनीषा तातडीने मदतीसाठी धावली. विशेष म्हणजे, उषा आणि मनीषा या दोघी सख्या बहिणी असून त्यांचा विवाह एकाच घरात झाला होता. मनीषाने उषाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या उषाने तिच्यावरही कात्रीने जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी महिलेने स्वतःवरही कात्रीने वार करून आत्महत्या केली.

हे ही वाचा : उपोषणाला बसतो अन् बाथरुममध्ये खातो; कदमांच्या जहरी टीकेनंतर जरांगे भडकले; म्हणाले, “थोरली बेगम”

शेजारी जमा झाले अन्...

आरडाओरडा ऐकून शेजारी व इतर कुटुंबीय घटनास्थळी धावले आणि त्यांनी सर्व जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी उषा, मुलगी नंदिता आणि मुलगा मुकुल यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या मनीषाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जयपूरला हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक (FSL) पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले.

हे ही वाचा : Govt Jobs : स्टेशन मास्टरच्या 1250 पदांसाठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

कुटुंबियांकडून पोलिसांत तक्रार नाहीच

कुटुंबीयांकडून कोणतीही लिखित तक्रार प्राप्त न झाल्याने पोलिसांनी वैद्यकीय पथकाकडून तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या सुपूर्द केले. या हृदयद्रावक घटनेत एकाच वेळी तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बाहेर पडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले; रात्री उशिरा आई उषा आणि तिची मुलगी नंदिता यांच्यावर एकाच चितेवर, तर मुलगा मुकुलवर दुसऱ्या चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खेरली पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय सिंह चंदेल यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने कसून तपास करत आहेत.