बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह! 4 दिवसांनंतर पाहिलं अन्...
4 दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानातील फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. एका व्हेज बिर्याणी दुकानात ही भयानक घटना घडली. हे दुकान गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं आणि रविवारी मालकाने दुकान उघडल्यानंतर भयंकर दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिरयानीच्या दुकानातील फ्रीजमध्ये आढळला 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह!
नेमकं प्रकरण काय?
Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानातील फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. जीसीआरजी कॉलेज गेटजवळील एका व्हेज बिर्याणी दुकानात ही भयानक घटना घडली. हे दुकान गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं आणि रविवारी मालकाने दुकान उघडल्यानंतर भयंकर दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
विजय पाल (38) अशी मृत तरुणाची ओळख समोर आली असून तो बीकेटीच्या किशुनपूर गावातील रहिवासी होता. वृत्तानुसार, दुकानाचा मालक 4 दिवसांनंतर परतला आणि त्याला फ्रीजमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यावेळी, तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
फ्रीजमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह...
प्रकरणाची माहिती पोलीस त्वरीत घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात बरेच महत्त्वाचे पुरावे समोर आले. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की हे एक तात्पुरतं म्हणजेच टेम्पररी दुकान होतं आणि आत फ्रीजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. त्या फ्रीजचं वीज कनेक्शन देखील कापण्यात आलं होतं. मृत तरुणाच्या खिशातून एक मोबाईल फोन आणि आधार कार्ड सापडलं असून त्याआधारे मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली. मृतदेहावर कोणत्याही गंभीर दुखापतीच्या खुणा नव्हत्या.










