आईचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध, 14 वर्षीय मुलाचा विरोध अन् भयंकर शेवट

मुंबई तक

कानपूरमधील 14 वर्षीय सत्यमने आपल्या आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आईने तिच्या प्रियकराशी फोनवर बोलण्यास सत्यमचा विरोध होता. त्याच्या आईने आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याच्या लहान भावाने सत्य उघड केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

point

14 वर्षीय मुलाचा विरोध अन् भयंकर शेवट

Crime News : आईच्या अनैतिक संबंधांना कंटाळून 14 वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, सत्यमच्या धाकट्या भावाने दिलेल्या जबानीनंतर या घटनेमागील खळबळजनक वास्तव समोर आले आहे. कानपूरमधील ही घटना आहे.

आईचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यमचे वडील सर्वेश हे कामानिमित्त मुंबईत राहतात, तर त्याची आई सुनीता दोन्ही मुलांसह गावात राहते. सुनीताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असून ती नेहमी त्याच्याशी फोनवर बोलत असे. सत्यमचा या गोष्टीला तीव्र विरोध होता. तो जेव्हा जेव्हा आईला समजावण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा आई त्याला रागावून शांत करत असे. आईच्या या वागण्याला कंटाळून अखेर सत्यमने आईच्याच साडीने गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले, एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा बनाव

घटनेच्या दिवशी सत्यमने गळफास घेतल्यानंतर आई आणि धाकट्या भावाने त्याचा मृतदेह खाली उतरवला. यानंतर प्रकरण अंगलट येईल या भीतीने आईने मुलाचा आजारपणाने मृत्यू झाल्याचा बनाव रचला आणि गावात तसाच प्रचार केला. तिने धाकट्या मुलालाही पोलीस आणि ग्रामस्थांसमोर आजारपणाचीच कथा सांगण्यास भाग पाडले. मात्र, मानगुटीवरील निळे वळ आणि आईच्या प्रेमसंबंधांबद्दल आधीपासून ठाऊक असलेल्या ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.

हे ही वाचा : बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा

पोलिसांचीही केली दिशाभूल

सुरवातीला पोलिसांनाही दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रकरण संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ पोलिसांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी पुन्हा कसून चौकशी केली. त्यावेळी धाकट्या भावाने भावनिक होऊन आईच्या प्रेमसंबंधांतूनच भावाने आत्महत्या केल्याची कबुली दिली. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात गळ्याभोवती फासाचे वळ असल्याचे स्पष्ट केले असून, पुढील तपासासाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवला आहे. याप्रकरणी पोलीस व्हिसेरा अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.