विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

मुंबई तक

मिळालेल्या माहितीनुसार, एका विवाहित महिलेने आपल्या 28 वर्षीय प्रियकराला मध्यरात्री फोन करून घरी भेटण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर पीडित तरुण आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी पोहोचला. पण सकाळी भयानक अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!
सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं...

point

पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!

Crime News: प्रेमप्रकरणातून एका 28 वर्षीय तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, पीडित तरुण मध्यरात्री आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता मात्र, त्यावेळी तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केली. संबंधित घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बराढी गावात घडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, शैलेंद्र कुमार सिंह अशी मृत तरुणाची ओळख असून तो पायाने अपंग असल्याची माहिती आहे. 

कुटुंबियांच्या माहितीनुसार, पीडित शैलेंद्रचे त्याच्या गावातील रागिनी मिश्रा या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी आरोप केला की, रागिनीने शनिवारी शेलेंद्रला फोन करून मध्यरात्री घरी भेटण्यासाठी बोलवलं. प्रेमात वेडा झालेला शैलेंद्र कोणताही विचार न करत आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी पोहोचला. त्यावेळी, तरुणाने त्याच्या घरातील सदस्यांना एका कामानिमित्त बाहेर जात असल्याचं सांगितलं. 

हे ही वाचा: पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका

मृताच्या कुटुंबियांचे आरोप... 

कुटुंबियांच्या आरोपानुसार, शैलेंद्र आपल्या प्रेयसीच्या खोलीत गेला मात्र, त्यावेळी महिलेचा पती आणि घरातील इतर लोकांनी त्याला रंगेहात पकडलं. तसेच, तरुण अपंग असल्यामुळे तो तिथून पळून जाण्यात सुद्धा अयशस्वी ठरला. शेवटी, प्रेयसीच्या संतापलेल्या कुटुंबियांनी त्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शैलेंद्रचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. 

हे ही वाचा: मोठी बातमी! नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 18 जखमी

पोलिसांनी तातडीने तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच, या प्रकरणासंबंधी त्वरीत कारवाई करत महिलेचा पती दद्दू मिश्रा याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध हत्येशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सुरूवातीच्या तपासात बेदम मारहाण झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. आता, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp