मोठी बातमी! नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 18 जखमी
नागपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील राऊळगाव, तहसील काटोल येथील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू आणि इतर 18 मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपुरात काटोल येथील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट!
दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू तर 18 जखमी
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील राऊळगाव, तहसील काटोल येथील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. कंपनीत मोठा स्फोट झाल्याने तिथे भीषण आग लागली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू आणि इतर 18 मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली. यातील 4 जण गंभीररित्या जखमी असून यामध्ये बहुतेक महिला असल्याचं सांगितलं जात आहे.
एकाचा मृत्यू तर 12 जण जखमी
राऊळगाव, तहसील काटोल येथील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. संबंधित कंपनीचे नाव एसबीएल (SBL) एनर्जी असून ती गनपावडरच्या उत्पादनाचं काम सुरू होतं. तसेच, अपघातातील जखमी व्यक्तींना त्वरीत नागपुरला उपचारासाठी हलवण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 15 जणांचा मृत्यू आणि इतर 18 मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा: "राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट
पीडितांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या एसबीएल एनर्जी नावाची कंपनीत या भीषण स्फोट झाला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून या भीषण स्फोटाची माहिती मिळवली आणि पीडितांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचत असल्याचं वृत्त आहे.










