गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत; शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

मुंबई तक

Gadchiroli News : गडचिरोली  जिल्ह्यात  बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुढे आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. 

ADVERTISEMENT

Gadchiroli News
Gadchiroli News
google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता

point

कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत

point

शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

Gadchiroli News, व्यंकटेश गड : गडचिरोली  जिल्ह्यात  बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुढे आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. 

हे ही वाचा : अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून

शाखा व्यवस्थापकाची आडमुठी भूमिका

काटली (जि. गडचिरोली) येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांची मुलगी व जावई 25 फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने 'खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही', अशी आडमुठी भूमिका घेत त्यांना परत लावले. 

हे ही वाचा : Govt Job: 'IIM मुंबई'कडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...

हे वाचलं का?