Govt Job: 'IIM मुंबई'कडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...

मुंबई तक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईकडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या या भरतीसाठी उमेदवारांसाठी कोणत्याही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही.

ADVERTISEMENT

'IIM मुंबई'कडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती!
'IIM मुंबई'कडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'IIM मुंबई'कडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती!

point

कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...

Govt Job: मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईकडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या या भरतीसाठी उमेदवारांसाठी कोणत्याही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही. थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 10 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

IIM च्या या भरतीअंतर्गत असोसिएट मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. पुढील पदांसाठी IIM मुंबईत निघाली भरती. 

असोसिएट मॅनेजर (सिव्हिल) 
असोसिएट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 
असोसिएट मॅनेजर (आयटी सिस्टिम/ एनालिस्ट) 
असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) 
असिस्टंट मॅनेजर (MEP) 
सीनिअर हिंदी ट्रान्स्लेटर 
जुनिअर हिंदी ट्रान्स्लेटर 

शैक्षणिक पात्रता 

असोसिएट मॅनेजर पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित इंजीनिअरिंग शाखेत किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर्स डिग्री आणि 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.  तसेच, असिस्टंट मॅनेजर पदांसाठी उमेदवारांकडे किमान 55 टक्के गुणांसह इंजीनिअरिंग डिग्री किंवा 60 टक्के गुणांसह डिप्लोमा तसेच संबंधित क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं आहे. यासोबतच, सीनिअर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी हिंदी किंवा इंग्रजी विषयात मास्टर्स डिग्रीसह 2 वर्षांचा अनुभव आणि जूनियर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी मास्टर्स डिग्रीसह 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स अनिवार्य आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp