अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून
जिल्ह्यातील भातकुली शहरात चिकन खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका मुलाने आपल्या 12 वर्षीय मामेभावावर रॉडने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रॉडने हल्ला केल्यानंतर, पीडिता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद...
रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून
अमरावतीतील धक्कादायक घटना
Amravati Crime: अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील भातकुली शहरात चिकन खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका मुलाने आपल्या 12 वर्षीय मामेभावावर रॉडने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रॉडने हल्ला केल्यानंतर, पीडिता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावे लपवण्यासाठी आरोपीने हत्येची ही घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. अखेर, पोलिसांनी त्याला अटक केल्याचं सांगितलं जात आहे.
दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद...
संबंधित घटना ही अमरावतीच्या भातकुली तालुक्यात घडली असून या घटनेने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणातील मृत मुलाचं नाव जितेराजा गौड (12) असून बब्बू गौड (21) असं आरोपी तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद सुरू झाला. यामुळे संतापलेल्या बब्बूने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉडने पीडित जितेराजावर हल्ला केला. या हल्ल्यात, पीडित मुलाच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!
पोलिसांना दिशाभूल करण्याचा वडिलांचा प्रयत्न
या घटनेनंतर, आरोपी बब्बूने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मृताच्या वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाचा अपघातामुळे मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं. मुलाच्या वडिलांच्या या जबाबाच्या आधारे, पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवण्यात आला. मृताच्या वडिलांना नाटत होतं की हे प्रकरण हत्या म्हणून नव्हे तर अपघात मानून बंद करावं.
हे ही वाचा: सोलापूर : आई-वडील झोपेतून उठेनात दोन्ही मुली चिंतेत, समोरचं दृश्य पाहून काळजात धस्स झालं, नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
मात्र, भातकुली पोलिसांच्या मनात प्रकरणाच्या प्राथमिक तपासादरम्यान संशय निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बारकाईने तपास करण्यास सुरू केली. तपासादरम्यान, त्यांनी कुटुंबियांची कठोर चौकशी केली असता, घटनेमागचं सत्य उघडकीस आणण्यास मदत झाली. जितेराजाच्या शरीरावर खुणा पाहून पोलिसांना त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आला. शेवटी, कठोर चौकशीनंतर आरोपी तरुण बब्बू गौड याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे मिटवणे आणि पोलिसांना दिशाभूल केल्याप्रकरणी मृताच्या वडिलांना देखील आरोपी ठरवण्यात आलं.










