सोलापूर : आई-वडील झोपेतून उठेनात दोन्ही मुली चिंतेत, समोरचं दृश्य पाहून काळजात धस्स झालं, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Solapur Crime News : या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याची चर्चा आहे; मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्या की इतर काही कारण, याचा उलगडा तपासाअंती होणार आहे.

ADVERTISEMENT

Solapur Crime News
Solapur Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : आई-वडील झोपेतून उठेनात दोन्ही मुली चिंतेत

point

समोरचं दृश्य पाहून काळजात धस्स झालं, नेमकं काय घडलं?

Solapur Crime News : सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. राहत्या घरात पती-पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने आत्महत्या की घातपात..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मृतांची नावे सोमनाथ धानोप्पा पाटील (वय 40) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय 35) अशी आहेत. दोघेही मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवण हळ्ळी येथील रहिवासी असून सध्या ते कलावती नगर, सोलापूर येथे वास्तव्यास होते.

अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रात्री जेवण करून पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह झोपले होते. मात्र सकाळी आई-वडील उठत नसल्याचे पाहून मुलींनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांच्या तोंडातून फेस येत असल्याचे भीषण दृश्य मुलींनी पाहिले आणि त्या घाबरून गेल्या. तात्काळ त्यांनी आपल्या काकांना फोन करून माहिती दिली. काकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत दोघांना उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले.मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा : नवी मुंबई: मॅट्रिमोनिअल साइटवर महिलांशी ओळख, नंतर लैंगिक शोषण अन् पैसे सुद्धा उकळले! पोलिसांनी केला पर्दाफाश

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याची चर्चा आहे; मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्या की इतर काही कारण, याचा उलगडा तपासाअंती होणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp