Govt Jobs : भारत सरकारच्या डिफेन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, एक लाखाहून अधिक पगार
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : भारत सरकारच्या डिफेन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
एक लाखाहून अधिक पगार
HAL Recruitment : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या तब्बल 120 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये डिझाईन ट्रेनीच्या 60 आणि मॅनेजमेंट ट्रेनीच्या 60 पदांचा समावेश आहे. संबंधित अभियांत्रिकी शाखांमधून (B.E./B.Tech) उत्तीर्ण असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. खुल्या, इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांतील उमेदवारांना पदवीत किमान 70% गुण असणे आवश्यक आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी 60% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.
वयोमर्यादा आणि अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार असून एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
52 आठवड्यांचे प्रशिक्षण
निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतातील कोणत्याही उत्पादन, ओव्हरहॉल किंवा सर्व्हिसेस विभाग, तसेच संशोधन आणि डिझाईन केंद्रांमध्ये नियुक्त केले जाईल. उमेदवारांना सुरुवातीला 52 आठवड्यांचे (1 वर्ष) प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल, ज्यामध्ये सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक (On-the-Job) प्रशिक्षणाचा समावेश असेल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 50 हजार रुपये मूळ वेतन, परिवर्तनशील महागाई भत्ता आणि कॅन्टीन भत्त्यासह कंपनीच्या नियमांनुसार राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.
हे ही वाचा : डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...
किती पगार मिळणार?
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ग्रेड-II इंजिनिअर (अभियंता) पदावर कायम केले जाईल. यानंतर त्यांचा वेतनश्रेणी 50,000 ते 1,60,000 रुपये असणार आहे. सेवेत कायम झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मूळ वेतनासोबतच महागाई भत्ता, कॅफेटेरिया पद्धतीनुसार विविध भत्ते, घरभाडे भत्ता, कामगिरीवर आधारित वेतन (PRP), वैद्यकीय सुविधा, भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी आणि इतर सर्व सेवांअंतर्गत मिळणारे लाभ कंपनीच्या नियमांनुसार दिले जातील.
