डोंबिवली : युपीतून नातेवाईकांच्या घरी आली, रागात घरं सोडलं अन् सामुहिक बलात्कार
dombivli minor gang rape case : डोंबिवलीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका हॉटेल चालकाला अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवली : युपीतून नातेवाईकांच्या घरी आली
रागात घरं सोडलं अन् सामुहिक बलात्कार
dombivli minor gang rape case : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 22 वर्षीय हॉटेल चालक अंगूर सिंह याला अटक केली असून दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलीला मदतीच्या नावाखाली विश्वासात घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...
मदतीचं अमिष देऊन सामुहिक बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युपीतून नातेवाईकांच्या घरी आलेली मुलगी घरगुती वाद झाल्यानंतर संबंधित घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती बदलापूर-कटई मार्गावरील एका हॉटेलमध्ये पोहोचली. तेथे हॉटेल चालक अंगूर सिंह याने तिला मदत करण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांशी तिची ओळख करून दिली. मुलीला काम आणि राहण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या बहाण्याने तिला एका निर्जनस्थळी नेण्यात आले, जिथे तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : 'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
