डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...
bengaluru crime news : बंगळुरूमध्ये एका महिलेने एका कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनरवर वारंवार घरात प्रवेश करण्याचा आग्रह धरल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कंपनीने संबंधित डिलिव्हरी पार्टनरवर कारवाई केल्याचे महिलेने सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट!
पुढे सगळं अंगलट आलं अन्...
bengaluru crime news : बंगळुरूमध्ये एका महिलेने एका कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनरविरोधात गंभीर आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित डिलिव्हरी पार्टनरने डिलिव्हरीसाठी घरी आल्यानंतर वारंवार घरात येण्याची विनंती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपण स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही त्याने आग्रह सुरूच ठेवला, त्यामुळे आपण घाबरल्याचे महिलेने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या घटनेनंतर तिने झेप्टोकडे चौकशीची मागणी करत कंपनीच्या तक्रार निवारण यंत्रणेवरही टीका केली आहे.
हेही वाचा : विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न
महिलेच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी पार्टनर ऑर्डर देण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिलेने त्याला पाण्याची बाटली देत ती स्वतःकडेच ठेवण्यास सांगितले. काही वेळाने तो पुन्हा आला आणि आणखी पाणी मागितल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यानंतर त्याने पाच मिनिटांसाठी घरात येऊ देण्याची विनंती केली. मात्र महिलेने त्याला स्पष्ट नकार देत घराबाहेर पुरेशी जागा असल्याचे सांगितले आणि बाहेरच बसण्यास सांगितले.
हेही वाचा : 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट
