'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

abhijeet dipke reaction on gitanjali j angmo sanatan statement : सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावर अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचा उद्देश केवळ शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

abhijeet dipke reaction on gitanjali j angmo sanatan statement
abhijeet dipke reaction on gitanjali j angmo sanatan statement
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य;

point

आता अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Dipke reaction on Gitanjali J Angmo sanatan statement : "विश्वगुरू असणं म्हणजे काय हे कोणी दाखवलं असेल, तर ते भारताच्या 'जेन झी'नं. त्यांनी सनातन धर्माचा फक्त प्रचार केला नाही, तो त्यांनी जगला आहे", असं वक्तव्य सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी केलं होतं. यासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी  मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

हेही वाचा : पुणे : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची 'ती' कृती, शिवप्रेमींचा संताप VIDEO

धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय - अभिजीत दिपके 

गीतांजली आंगमो यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. "सीजेपीचा त्यांच्याशी त्या वक्तव्याच्या संदर्भात कोणताही संबंध नाही. धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि तो तसाच राहायला हवा," असे ते म्हणाले. स्वतःचाही धर्म वैयक्तिक असल्याचे सांगताना त्यांनी कोणाच्याही धार्मिक श्रद्धेवर भाष्य करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे नमूद केले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक मताचा संबंध संपूर्ण आंदोलनाशी जोडणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 'विरोधी पक्षांचं आंदोलन लोकचळवळ बनू शकत नाही..' अभिजीत दिपकेंनी स्पष्टच सांगितलं