पुणे : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची 'ती' कृती, शिवप्रेमींचा संताप VIDEO

मुंबई तक

pune lohagad fort smoking incident : लोहगड किल्ल्यावर काही तरुणांकडून कथितरित्या धूम्रपान केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारला. संबंधित तरुणांनी चूक मान्य करत माफी मागितल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.

ADVERTISEMENT

Pune Lohgad News
Pune Lohgad News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची 'ती' कृती

point

शिवप्रेमींचा संताप VIDEO

pune lohagad fort smoking incident : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर काही तरुणांकडून कथितरित्या सिगारेट ओढल्याचा प्रकार समोर आला असून, त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी संबंधित तरुणांना रोखून जाब विचारला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशांपैकी एक मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक इतिहास, निसर्ग आणि किल्ल्याचे वैभव अनुभवण्यासाठी येथे भेट देतात. अशा ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही वाचा : 'थोरल्या मुलाने माझ्यावर बलात्कार केलाय...' आईचा गंभीर आरोप, पुढं काय घडलं?

ऐतिहासिक ठिकाणी वावरताना जबाबदारीने वागण्याची गरज

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी संबंधित तरुणांना धूम्रपान केल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तरुणांनी आपली चूक मान्य करत माफी मागितल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर ऐतिहासिक ठिकाणी वावरताना पर्यटकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक पर्यटकाचीही जबाबदारी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

हेही वाचा : संजय राऊत फिल्म बनवणार, संसदेतच घोषणा, भाषण करत असताना जोरदार राडा