विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेच्या आंदोलनात खूप मोठा फरक असतो, असे मत सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षांना विशिष्ट राजकीय टॅग असतो आणि सामान्य जनतेला हा टॅग नको असतो. विरोधी पक्ष जेव्हा कोणतेही आंदोलन करतो, तेव्हा ती लोकचळवळ बनू शकत नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विरोधी पक्षांना यश येत नाही
मग सीजेपीच्या आंदोलनाच यश का आलं?
अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
Abhijeet Dipke Interview : विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेच्या आंदोलनात खूप मोठा फरक असतो, असे मत सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी व्यक्त केले आहे. मुंबई तकच्या महामुलाखतीत ते बोलत होते. विरोधी पक्षांना विशिष्ट राजकीय टॅग असतो आणि सामान्य जनतेला हा टॅग नको असतो. विरोधी पक्ष जेव्हा कोणतेही आंदोलन करतो, तेव्हा ती लोकचळवळ बनू शकत नाही. कारण त्यात त्यांचेच कार्यकर्ते असतात, पक्षाचेच झेंडे असतात आणि त्यांच्या घोषणाही केवळ स्वतःच्या नेत्यांचा जयजयकार करणाऱ्या असतात. 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा प्रकारच्या घोषणा राजकीय आंदोलनांत दिल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'आज माझ्या मुलाला न्याय मिळाला'
याउलट, एका खऱ्या लोकचळवळीत कोणत्याही व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या 'जिंदाबाद'च्या घोषणा लागत नाहीत. दीपके म्हणाले की, "आमच्या आंदोलनात सोनम सरांचे किंवा माझे कोणतेही नारे दिले गेले नाहीत. लोकचळवळीसाठी चेहऱ्यापेक्षा 'विषय' (Causes) महत्त्वाचा असतो." NEET परीक्षेच्या मुद्द्यावर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आमच्याकडे आले, कारण त्यांना या विषयाचे राजकारण करायचे नव्हते. राजीनाम्यानंतर रिया थापा या विद्यार्थिनीच्या वडिलांनी 'आज माझ्या मुलाला न्याय मिळाला' असा मेसेज पाठवल्याचे सांगत, लोकचळवळ ही कोणतीही राजकीय संस्था किंवा पक्ष करू शकत नाही, असे दीपके यांनी ठामपणे सांगितले.
हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
'सरकारचा जनतेशी संपर्क तुटलाय'
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना दीपके यांनी स्पष्ट केले की, सध्याचे सरकार सामान्य लोकांचे ऐकायला अजिबात तयार नाही. सरकारचा जनतेशी असलेला थेट संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या संस्था 'कॉम्प्रोमाईज' (तडजोड) झालेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत बसलेले लोक ऐकत नसताना आणि दुसरीकडे संस्थाही साथ देत नसताना 'आम्ही नक्की जायचे कुठे आणि बोलायचे कोणाकडे?' असा प्रश्न आज सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना पडलेला आहे.
हे ही वाचा : पुणे : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची 'ती' कृती, शिवप्रेमींचा संताप VIDEO
'विरोधकांबद्दल काहीही सांगता येत नाही'
विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तेत नसलेल्या आणि विरोधात असलेल्या लोकांवर जनता पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. कारण आज जे लोक विरोधात दिसत आहेत, ते उद्या कुठे असतील किंवा कोणत्या पक्षात असतील याविषयी काहीही सांगता येत नाही, अशी सडेतोड टीका त्यांनी केली. सत्ताधारी ऐकत नाहीत आणि विरोधकांवर भरवसा नाही, अशा परिस्थितीमुळेच सामान्य माणसाला स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी खऱ्या लोकचळवळीचा मार्ग निवडावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
