आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
Abhijit Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत आंदोलनावेळी घडलेल्या घडामोडींविषयी भाष्य केलं. शिवाय, त्यांनी लाठीचार्जवरुन अमित शाहांवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही?
अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
Abhijeet Dipke, छत्रपती संभाजीनगर : "आमची लढाई राजकीयच असेल. भारतातील प्रत्येकाने पॉलिटिकल असायला हवं. आपल्या देशात मी राजकारणाशी संबंध नसलेला आहे, असं अभिमानाने सांगितलं जातं. यात अभिमानाची काय गोष्ट आहे? तुमच्या घरात टूथपेस्ट आणता, त्यावर देखील टॅक्स लागतो. ते सुद्धा पॉलिटिकल असतो. आम आदमी पार्टी सोडली कारण मला बाहेर जायचं होतं. पैसा तेवढा मिळत नव्हता. माझं 30 हजारात कसं घर चालणार? उद्या जाऊन आई-वडिलांना सांभाळायचं आहे. अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचा प्लॅन होता. तिथे कमवून घराच्यांनाही तिकडं नेता येईल, असा विचार होता", असं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले. ते 'मुंबई Tak' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा : 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट
'सरकारी अधिकारी सामान्यांशी कसे बोलतात?'
यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, अमेरिकेत बेटर लाईफ मिळेल असा विचार होता. इकडं हवा चांगली नाही, पाणी चांगलं नाही. तक्रार करायला गेलो तर सरकारी अधिकारी कसे बोलतात? हे आपल्याला माहिती आहे. आमदार-खासदाराचा मुलगा गेला तर दादा-दादा, भाऊ-भाऊ करतील.. आम्ही गेलो की, म्हणतील सरक ..त्या खिडकीवर जा.. आपल्या देशात डिग्निटी नाही.
हेही वाचा : Maharashtra weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचा हाहाकार, IMD चा मोठा अलर्ट
