'त्यांचे PHD च्या विद्यार्थीनीसोबत अनैतिक संबंध...' IIT मधील महिला प्रोफेसरसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

आयआयटी कानपूरमधील एका प्राध्यापकावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचार, मानसिक छळ, मारहाण आणि अनैतिक संबंधांचा आरोप केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, त्यात पतीवर एका सहकारी आणि एका माजी पीएचडी विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचाही आरोप आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

त्यांचे PHD च्या विद्यार्थीनीसोबत अनैतिक संबंध...

point

IIT मधील महिला प्रोफेसरसोबत घडलं भयंकर

Crime News : आयआयटी कानपूर मधील एका प्राध्यापकाविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. तक्रारदार महिला स्वतःदेखील आयआयटी कानपूरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून कानपूरमधील कल्याणपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या दाम्पत्याचा विवाह डिसेंबर 2012 मध्ये झाला असून त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पतीच्या आक्रमक वर्तनामुळे आपण आणि आपली मुले प्रचंड मानसिक तणावाखाली आणि भीतीत जगत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

विवाहित पीएचडी विद्यार्थिनीसोबत संबंध

महिलेने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पतीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2022 मध्ये पतीचे त्यांच्या हाताखालील एका विवाहित पीएचडी विद्यार्थिनीसोबत संबंध होते, तर नोव्हेंबर 2025 पासून एका महिला प्राध्यापकाशी त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संबंधांबाबत विचारणा केली असता, पतीने अधिक आक्रमक होऊन महिलेवर शांत राहण्यासाठी आणि हे संबंध स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया

धमकी, मारहाण अन् पाळत

तक्रारीत पतीने केलेल्या हिंसाचाराच्या घटनांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी पतीने घरातील साहित्याची तोडफोड करत मुलांची पुस्तके फेकून दिली आणि स्वयंपाकघरातील सुरी दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी अनैतिक संबंधांना विरोध केला असता पतीने मारहाण केली, ज्यामध्ये डोळा, कान आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे महिलेने सांगितले. तसेच 5 जुलै 2026 रोजी आरोपीने जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांना बोलवावे लागले होते. याशिवाय घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे स्वतःवर आणि मुलांवर सतत पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे.

हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं

आरोपी प्राध्यापक गप्प का?

या प्रकरणी तक्रारदार महिलेने दुखापतींचे फोटो, सीसीटीव्ही फुटेजचे दस्तऐवज, सुरक्षा विभागाला पाठवलेले ई-मेल आणि आयआयटी कानपूर पोलीस चौकीसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींच्या प्रती पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. महिलेने स्वतःच्या व मुलांच्या सुरक्षेची मागणी करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या कानपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या आरोपांवर संबंधित आरोपी प्राध्यापकाकडून अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.