मुंबईची खबर : मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत वाढ, 'या' भागाला सर्वाधिक पंसती

मुंबई तक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आलिशान घरांच्या बाबतीत मुंबईत सर्वाधिक कोणत्या ठिकाणाला पसंती मिळत आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत वाढ

point

'या' भागाला सर्वाधिक पंसती

Mumbai News : मुंबईतील अलिशान घरांच्या (लक्झरी हाऊसिंग) बाजारात सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत या क्षेत्रात विक्रमी व्यवहार झाले आहेत. 'इंडिया सोथेबीज इंटरनॅशनल रियल्टी' आणि 'सीआरई मॅट्रिक्स'ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते जून 2026 या कालावधीत 10 कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांची तब्बल 18,512 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही मुंबईतील लक्झरी निवासी बाजारातील आतापर्यंतची सर्वाधिक अर्धवार्षिक व्यवहार मूल्य नोंद ठरली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत 'इतकी' वाढ

गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील 16,518 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा या क्षेत्रात 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत 761 लक्झरी घरे विकली गेली होती. या तुलनेत 2026 मधील जानेवारी ते जून या महिन्यांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं

तब्बल 957 घरांची विक्री

व्यवहारांच्या मूल्यासोबतच खरेदीतील प्रत्यक्ष संख्याही कमालीची वाढली आहे. 2026 च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात 957 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, या अलिशान घरांची मागणी प्रामुख्याने मुंबईतील काही ठराविक व नामांकित भागातच केंद्रित असल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार, मुंबईतील एकूण प्राथमिक लक्झरी गृहविक्रीच्या मूल्यात एकट्या 10 प्रमुख परिसरांचा वाटा तब्बल 80 टक्के इतका राहिला आहे.

हे ही वाचा : डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...

वरळीला सर्वाधिक पसंती

या सर्व परिसरांमध्ये वरळी भागाने सर्वाधिक 4,493 कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवत अग्रस्थान पटकावले आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 79 टक्क्यांनी अधिक आहे. वरळीमध्ये घरांच्या विक्रीच्या संख्येतही मोठी झेप पाहायला मिळाली. गेल्या वर्षी याच काळात जिथे 35 अलिशान घरे विकली गेली होती, तिथे यंदा जानेवारी ते जूनदरम्यान 159 घरांची विक्री झाली आहे.  पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि दर्जेदार नवीन प्रकल्पांमुळे वरळी, ताडदेव, लोअर परळ आणि वांद्रे वेस्ट यांसारख्या प्रस्थापित भागांना ग्राहकांची पहिली पसंती मिळत असल्याचं बोललं जात आहे.