वाशीम : पत्नीच्या थंड डोक्याचा अंदाज आला नाही, प्रियकराच्या मदतीने केला गेम
washim crime news : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात प्रेमसंबंधातून एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाशीम : पत्नीच्या थंड डोक्याचा अंदाज आला नाही
, प्रियकराच्या मदतीने केला गेम
washim crime news : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथे महिलेने प्रियकराच्या पतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पत्नी आशा झलके आणि तिचा प्रियकर महादेव अंभोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'जेन झी'नं सनातन धर्म जगला, गीतांजली आंगमो यांचं वक्तव्य; आता अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर खळबळ, अखेर हत्येचं कारण समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानी येथील सुरेश झलके हे पत्नीसह वाकळवाडी येथे सासरी वास्तव्यास होते. काल त्यांचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकी आणि मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र घटनास्थळावरील पुरावे आणि त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
हेही वाचा : विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
