‘मला तर शिव्या दिल्या पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा.., आपल्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात?’, PM मोदींचा नवा Insta Reel
PM Modi Gen Z Video: जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर मोदींनी रात्री उशिरा Instagram वरून Gen Z ला संबोधित केलं. ‘मुलांना माफ करू इच्छितो, त्यांना शिक्षा नव्हे तर योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे’, असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (31जुलै) रात्री उशिरा Gen Z ला संबोधित केलं. रात्री सुमारे 11 वाजल्यानंतर मोदींनी Instagram वर एक नवा रिल शेअर केला आणि त्यांनी या घटनेवर आपली भूमिका मांडली. त्यांनी संबंधित मुलांना माफ करण्याची इच्छा व्यक्त केली.
‘मला आणि माझ्या दिवंगत आईला शिव्या दिल्या’
पंतप्रधान मोदी रिलमध्ये म्हणाले की, ‘जंतर-मंतरवर जे काही घडलं ते देश आणि जगाने पाहिलं आहे. काही मुलांनी अतिशय आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर केला. या वक्तव्यांमध्ये त्यांनी मला आणि माझ्या दिवंगत आईला देखील घाणेरड्या शिव्या दिल्या.’
‘मात्र, या घटनेकडे केवळ रागाच्या भावनेतून पाहण्याऐवजी मुलांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे’, असं मोदींनी म्हटलं.
‘लहान वयात चुका होतात, सुधारण्याची संधीही मिळते’
मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं की, ‘लहान वयात चुका होतात आणि त्या चुकांमधून सुधारण्याची संधीही मिळते. त्यामुळे या घटनेबाबत समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो’, असं त्यांनी सांगितलं.
